शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

अंगणवाडीतील मुलांना हवे शैक्षणिक साहित्य

By admin | Updated: July 21, 2014 00:26 IST

हजारो गरजू मुले वंचित

कृष्णा सावंत -पेरणोलीकोल्हापूर जिल्ह्यातील महिला बालविकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यामध्ये दोन वर्षांपासून शैक्षणिक साहित्याचा पुरवठा न झाल्याने हजारो गरजू मुले शैक्षणिक साहित्यापासून वंचित आहेत.२०१० मध्ये झालेल्या शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेपासून एकही मुलं वंचित राहू नये. त्याचबरोबर गळती राहू नये व मुलांना वयाच्या तीन वर्षांपासूनच शाळेची आवड निर्माण व्हावी. समाजातील सर्वच दुर्लक्षित घटकांना शिक्षण प्रवाहात आणावे या उद्देशाने १० ते १५ वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्च करून अंगणवाड्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने गावागावांतील महिलांना रोजगार मिळाला आहे. मुलांमध्ये शाळेची आवड व रुची निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी पाटी, चित्रकला पुस्तिका, रंगीत खडू, गणवेश, आदी शैक्षणिक साहित्यांचा पुरवठा केला जातो. २०१०-११ पर्यंत सर्वच वर्गांतील मुलांना साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.मात्र, गेल्या दोन वर्षांपासून साहित्यांचे वाटप न करण्यात आल्याने विशेषत: गरीब पालकांमधून जिल्हा परिषदेच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष घटक योजनेमधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दरवर्षी देण्यात येतो. मात्र, जुलै महिना संपत आला तरी अद्याप गणवेश, पाटी, रंगीत खडू, चित्रकला पुस्तिका, आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आलेले नाही. २०१०-११ मध्ये एकदाच खुल्या वर्गातील मुलांना शालेय गणवेश देण्यात आला. त्यानंतर गणवेश वाटप करण्यात आलेले नाही.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शाळेऐवजी बाह्य कामकाजात गुंतवून ठेवण्यात आले आहे. शासनाकडून येणाऱ्या साहित्यांमधून घराकडूनच मुलांना खाऊ तयार करून आणावा लागतो. शासनाकडून तुटपुंजी अवांतर खर्चाची रक्कम मिळते. त्यामुळे स्वखर्चातूनच पीठाच्या गिरणीचा खर्च, गॅस, रॉकेलचा खर्च काहीवेळा करावा लागतो. त्यात कार्यालयातील बैठका त्यामुळे मुलांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होते.जिल्ह्यातील अनेक गावांत दोन अंगणवाड्या एकाच वर्गात बसविल्या जातात. आजरा तालुक्यातील खेडे, पेरणोली, वझरे, कुसळवाडी, आदी बहुसंख्य गावात एकाच वर्गात दोन अंगणवाड्या भरविल्या जात आहेत. सध्या फेडरेशनच्यावतीने लाफसी व खिचडी, सोजी करण्यासाठी गहू दिला जातो. गहू भरडून सोजी तयार करण्यामध्ये सेविकांचा वेळ वाया जातो. त्याशिवाय दिलेला गहू व तयार केलेल्या सोजीमधील वजनामध्ये तफावत आढळून येते. त्यामुळे गहूऐवजी सोजी द्या, अशी मागणी पालकांमधून होत आहे.