शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी मुलाचा आई-वडिलांवर हल्ला

By उद्धव गोडसे | Updated: July 7, 2024 13:22 IST

उत्तरेश्वर पेठेतील घटना, हतबल नातेवाईकांची पोलिसात धाव

उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : 'तुम्ही उद्या दुपारपर्यंत माझ्या बँक खात्यावर दोन लाख रुपये पाठवा. नाहीतर दोघांना ठार मारतो,' असे धमकावत पोटच्या मुलाने आई-वडिलांवर तलवारीने हल्ला केला. सुदैवाने घराचा दरवाजा बंद केल्याने आई-वडील बचावले. हा प्रकार उत्तरेश्वर पेठेत शुक्रवारी (दि. ५) मध्यरात्रीच्या सुमारास घडला. याबाबत वडील जीवन विलासराव नलवडे (वय ५६, रा. उत्तरेश्वर पेठ) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मुलगा साई (वय २४) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेश्वर पेठेतील साई नलवडे हा सातारा येथील सैनिक शाळेत शिकला. त्यानंतर एका नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, चुकीच्या संगतीमुळे त्याला व्यसन जडले. यातून महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यात सुटले. गेल्या काही वर्षांपासून तो आई, वडिलांना दमदाटी करून पैसे उकळत होता. शुक्रवारी रात्री त्याने तलवारीचा धाक दाखवत वडिलांकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. उद्या दुपारपर्यंत पैसे माझ्या बँक खात्यात जमा झाले नाहीत, तर तुम्हाला दोघांनाही ठार मारणार, अशी धमकी त्याने दिली. यावेळी तलवार घेऊन अंगावर येणा-या मुलाला वडिलांनी घराबाहेर ढकलून दरवाजा लावून घेतला. मुलाने घराच्या दरवाजावर, जिन्याच्या ग्रिलवर आणि भिंतीवर तलवार मारत दहशत माजवली. या प्रकाराने घाबरलेल्या आई, वडिलांसह इतर नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलाच्या विरोधात फिर्याद दिली.

समुपदेशनाचा सल्ला

चुकीची संगत आणि व्यसनांमुळे आई, वडिलांवर हात उगारणा-या मुलाला शिक्षेपेक्षा समुपदेशनाची गरज आहे. त्याच्या समुपदेशनासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी नलवडे कुटुंबीयांना दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर