शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संभाजीराजे यांच्याशी आज करणार चर्चा; शरद पवारांचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 09:19 IST

उपोषण मागे घेण्याची शक्यता.

विश्वास पाटीलकोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी शनिवारपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या खासदार संभाजीराजे यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सोमवारी (दि २८) चर्चा करणार आहेत. त्यामुळे हे बेमुदत उपोषण मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. त्याला कोल्हापूरसह राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. कोल्हापूरात दसरा चौकात साखळी उपोषण सुरू असून ठिकठिकाणी रास्ता रोको, बंदचे आवाहन करण्यात येत आहे. समाजाच्या प्रश्नांसाठी कोणतरी रस्त्यावर उतरत आहे. त्याला पाठबळ दिले पाहिजे या भावनेतून लोक त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत.

या पार्श्वभूमीवर रविवारी या आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. त्याचे केंद्र अर्थातच कोल्हापूर राहिले. छत्रपती घराण्याचे निकटवर्ती आणि जेष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू व्ही.बी.पाटील यांची यातून कसा तोडगा काढता येईल यासंबंधी छत्रपती शाहू महाराज यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर ही चर्चा पाटील यांनी पवार यांच्या कानांवर घातली. तेवढ्यावरच हा विषय थांबला नाही. पवार यांच्या सुचनेवरून तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे रविवारीच आझाद मैदानावर जाऊन संभाजीराजे यांना भेटले व त्यांच्याशी चर्चा केली.

पवार हे दिवसभरात शाहू छत्रपती यांच्याशी दोनवेळा बोलले. त्या चर्चेच्या आधारे नंतर पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातही संभाजीराजे यांच्या मागण्यांबद्धल चर्चा झाली. त्यांनी केलेल्या मागण्या मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यातील कांही विषय राज्यपाल यांच्या पातळीवर प्रलंबित आहेत. केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यपालही मराठा आरक्षणासह अनेक प्रश्नांवर राज्य सरकारची शक्य तितकी कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत संभाजीराजे यांनीही भाजपचा राजकीय फायदा होईल अशी कोणतीही कृती करू नये अशी विनंती त्यांना करण्यात आली.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सोमवारी मुख्यमंत्री ठाकरे हे संभाजीराजे यांच्याशी चर्चा करणार आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात कांही ठोस आश्वासन त्यांच्याकडून अपेक्षित आहे. हे झाल्यानंतर संभाजीराजे आंदोलन मागे किंवा स्थगित करत असल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

शाहू महाराज केंद्रस्थानीरविवारी दिवसभर जेष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री वळसे पाटील यांची भेट या सर्व घडामोडीच्या केंद्रस्थानी शाहू छत्रपत्री हे राहिले. या सर्वांना एकत्र आणण्याची भूमिका व्ही.बी.पाटील यांनी पडद्याआड सूत्रे हलवून पार पाडली.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार