शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

मुख्यमंत्री, उद्धव हेच भ्रष्टाचाराला जबाबदार

By admin | Updated: February 17, 2017 23:44 IST

नारायण राणेंचा घणाघात : पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप का?

कुडाळ : उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस हेच भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा फेकाडा मुख्यमंत्री आपण पाहिला नाही. माझ्या लोकप्रतिनिधींना चोर म्हणणाऱ्या या चोरांना सोडणार नाही, असा इशारा देतानाच सेना-भाजपकडे पुरेसे उमेदवार नाहीत, ते आमच्याशी काय लढणार? असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सेना भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबई महापालिका निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक करणारे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भ्रष्टाचाराला तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारासाठी त्यांनी एकमेकांवर बोट दाखविणे थांबवावे.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील नवीन एस.टी. डेपो मैदानावर शुक्रवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने जाहीर प्रचार सभा झाली. या प्रचार सभेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, उपजिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सुनील भोगटे, कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष दिनेश साळगावकर, कुडाळचे नगराध्यक्ष विनायक राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र्र साठे, युवक काँग्रेसचे लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, राकेश कांदे, सुदन बांदिवडेकर, डॉ. जयेंद्र्र परूळेकर, अस्मिता बांदेकर, भाके वारंग, संदीप कदम, विशाल परब, काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार पक्षाचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी टीका करताना राणे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी माझ्याच जिल्ह्यात येऊन माझ्यावरच बोलण्याची हिम्मत करू नये. लोक त्यांना जुमानणार नाहीत. रविंद्र चव्हाणांसारखे मंत्री आमच्याकडे यात्रेत फिरतात. नगरपालिकेसाठी जिल्'ात फिरलेल्या चव्हाणांना केवळ कुडाळात आणि सावंतवाडी एकच उमेदवार निवडून आणता. वस्त्रहरण त्यांनी बघावे की राणेंची सभा लागते तेव्हा खुर्च्या कमी पडतात. वस्त्रहरण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांची अवस्था पाहून त्यांच्याकडे वस्त्रच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यांचे वस्त्रहरण कसे करणार, असा टोला त्यांनी युती सरकारला लगावला.मुख्यमंत्र्यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्या म्हणजे..नीतेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत आपण खुर्च्या मोजत नव्हतो; तर भाजपत गेलेल्यांची राजकीय लायकी जनतेला दाखवित होतो. पंतप्रधानांना आणून देखील भाजपचा विधानसभेत पराभव झाला.