शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ‘फडणवीस’ की ‘चंद्रकांतदादा’ हेच कळत नाही : नाना पटोले यांचा टोला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:10 IST

कर्जमाफीच्यावेळी रोज नवीन आदेश निघत होते. यामध्ये एक आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढल्यावर दुसरा आदेश मुख्यमंत्री फडणवीस काढला. त्याचबरोबर नारायण राणेंसह प्रत्येकाला मंत्री करणार म्हणून दररोज चंद्रकांतदादा सांगत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांतदादा हेच कळत नाही, असा टोला भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हाणला. सरकारकडून जनतेची अपेक्षापूर्ती न होता नोटा बंदीतून काळा पैसा बाहेर आलाच नाही असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

ठळक मुद्देनोटाबंदी मुळे काळा पैसा बाहेर आलाच नाहीचांगला कारभार केल्याच्या जाहीरात करत आहे, तर मग लोक रस्त्यांवर उतरून मोर्चे का काढतात? खुर्चीवर बसल्यावर भूमिका बदलतातराजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होणार

कोल्हापूर ,दि.  ०६ :  कर्जमाफीच्यावेळी रोज नवीन आदेश निघत होते. यामध्ये एक आदेश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढल्यावर दुसरा आदेश मुख्यमंत्री फडणवीस काढला. त्याचबरोबर नारायण राणेंसह प्रत्येकाला मंत्री करणार म्हणून दररोज चंद्रकांतदादा सांगत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत की चंद्रकांतदादा हेच कळत नाही, असा टोला भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हाणला. सरकारकडून जनतेची अपेक्षापूर्ती न होता नोटा बंदीतून काळा पैसा बाहेर आलाच नाही असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

कोल्हापूरात एका कार्यक्रमानिमित्त खासदार नाना पटोले आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रत्येकाला मंत्री करणार असे सांगतात, नारायण राणे यांनाही ते असेच सांगत आहे. त्याचबरोबर सरकारचे अनेक निर्णय स्वत: चंद्रकांत दादाच घेत असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री नेमकं कोण देवेंद्र फडणवीस की चंद्रकांत पाटील हे समजत नाहीत, असा टोलाही पटोले यांनी हाणला.

चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यात दहा लाख शेतकरी बोगस आहेत अशी घोषणा केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य कर्जबाजारी करायचे का? असे वक्तव्य केले होते. यावरुन सरकार शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे हे दिसत आहे. केंद्र व राज्य सरकारने तीन वर्षात चांगला कारभार केल्याच्या जाहीरात करत आहे, तर मग लोक रस्त्यांवर उतरून मोर्चे का काढतात? असा खोचक सवालही खासदार पटोले यांनी उपस्थित केला.

लोकांची अपेक्षापूर्ती झाली नसल्याने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नाराजी वाढत असल्याचे सांगून सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. खुर्चीवर बसण्यापूर्वी व खूचीवर बसल्यावर नेत्यांच्या भूमिका बदलतात,असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार उदासिनआहे. देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या महाराष्ट्रात होतआहेत. किटकनाशकामुळे शेतकरी जीवाला मुकत आहेत. यवतमाळ जिल्हा हा त्याचा केंद्रबिंदू आहे. या संदर्भात पंतप्रधान, केंद्रीय कृषीमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सरते शेवटी यवतमाळला आले. असे पटोले यांनी सांगितले.

कर्ज, बोगस किटकनाशके, नकली बियाणे संदर्भात लोकसभेने संयुक्त समितीनियुक्ती करावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी आपण भेट घेत आहे.सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी चुकीच्या कारभाराबद्दललोकप्रतिनिधींनी बोललेच पाहिजे याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तसेच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दारुसंदर्भात केलेल्या वक्तव्याचाही पटोले यांनी निषेध केला.

कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिली चुकीची कबुलीराज्यसरकारकडून कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांकडून फॉर्म भरुन घेणे, आॅनलाईनअर्ज दाखल करणे यागोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहे, अशी टीका आपण केली होती. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही कर्जमाफीची अंमलबजावणी करताना चुका झाल्याची कबुली दिली. असे पटोले यांनी सांगितले.

खुर्चीवर बसल्यावर भूमिका बदलतातनोटबंदी व जीएसटीमुळे देशाचे नुकसान झाले आहे.नोटाबंदीनंतर जमा होणारे काळा पैसा, नकली नोटा कुठे आहेत?,नोटाबंदीत रांगेत उभारणारी ३०० नागरिक मरण पावले. नोटाबंदी वजीएसटी अंमलबजावणीवर आम्ही टीका केल्यानंतर केंद्र सरकार जीएसटीच्या दरात सुधारणा करत आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयावर आपल्यासह यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी टीका करत आहेत. भाजपच्या संविधानातही लोकप्रतिनिधींची जी कर्तव्येआहेत त्यानुसार आम्ही सरकारच्या चुकांकडे लक्ष वेधत आहोते, असे पटोेले यांनी सांगितले.

राजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होणारशेतकऱ्यांच्या हितासाठी २० नोव्हेंबरला दिल्ली येथे खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये आपण सहभागी होणार असल्याचे सांगून भाजपचा नारा सात बारा कोरा, झाला नसल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील