शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमचे हिंदुत्व लोकांचे अश्रू पुसणारे - एकनाथ शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 11:46 IST

सिद्धगिरी मठावर 'संत समावेश' कार्यक्रमाचा समारोप

गोकुळ शिरगाव : आमचे हिंदुत्व हे बेगडी नसून, लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारे आहे. आमच्या सरकारमध्ये साधु-संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिला. कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावर आयोजित संत समावेश कार्यक्रमाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे काही लोकांना पचनी पडत नाही. हिंदू धर्माच्या उत्थानासाठी जे जे करावे लागेल त्यासाठी सरकार सक्षम आहे. राज्याचे आणि देशाचे एकात्मिकरण जोपासायचे असेल तर या धर्मसंमेलनासारखी जनजागृती करणे आवश्यक आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना पालघरमध्ये दोन साधूंचे हत्याकांड झाले. त्यावेळी तत्कालीन सरकार गप्प होते. आमच्या सरकारमध्ये साधुसंतांच्या केसालाही हात लागू देणार नाही.यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, प्रताप कोंडेकर, रामगिरी महाराज, अक्षय महाराज भोसले, राणा महाराज वास्कर उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळ येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

माझ्या पाठीशी जनता, आध्यात्मिक साधूंचे आशीर्वादराज्यात तीर्थक्षेत्र योजना, गडकोट किल्ल्यांचे संवर्धन, युनोस्कोमध्ये १४ किल्ल्यांची नोंद होण्यासाठी या सरकारने सकारात्मक पावले उचलली. मी स्वतः १८-१८ तास काम करतो. माझ्या पाठीशी जनता, आध्यात्मिक साधू-संत, महंतांचे आशीर्वाद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. देशाच्या एकूण गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आणल्याचा दावा त्यांनी केला.

मड्याच्या टाळूवरचे लोणी कोण खातेबदलापूरच्या आरोपीला फाशी द्या असे विरोधक म्हणत होते अन् दुसरीकडे कोर्टात जात होते. मड्याच्या टाळूवरचे लोणी खायचे काम कोण करते? हे आता जनतेनेच ओळखावे, या शब्दात शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

'सुरक्षित बहीण' योजना आणणारराज्यातल्या माझ्या माता-भगिनीकडे कोणी वाकड्या नजरेने बघितले, अन्याय- अत्याचार केले तर त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाही. यासाठी सुरक्षित बहीण योजना लवकरच आणणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

झुलवत ठेवणाऱ्यांना हक्क मागण्याचा अधिकार नाहीराज्यातील जनतेला आताच्या विरोधकांनी इतकी वर्ष झुलवत ठेवलं, ज्यांनी फक्त त्यांच्या मतांचा वापर केला आणि सत्ता भोगली त्यांना हक्क मागण्याचा अधिकार नाही या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ‘राष्ट्रवादीच्या हक्क मागतोय महाराष्ट्र’ या अभियानाची खिल्ली उडवली. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे काम आणि त्यांचे काम याची तुलना करा, आम्ही केलेल्या योजना, निर्णय याची बरोबरी करा आणि मग बोला. कुणाचे सरकार सर्वसामान्यांसाठी निर्णय घेते हे जनतेला माहीत आहे. यामुळेच महायुती आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजयी होणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. गेल्या दोन ते अडीच वर्षाच्या कार्यकाळात आम्ही कल्याणकारी योजना आणल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेWomenमहिला