शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कडकनाथ फसवणूकप्रकरणी मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 14:46 IST

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महारयत अ‍ॅग्रो कंपनीतील मुख्य सूत्रधार सुधीर शंकर मोहिते याला जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केले. त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देकडकनाथ फसवणूकप्रकरणी मुख्य सूत्रधार सुधीर मोहिते याला अटक चार दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महारयत अ‍ॅग्रो कंपनीतील मुख्य सूत्रधार सुधीर शंकर मोहिते याला जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केले. त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.महारयत अ‍ॅग्रो कंपनीचे सुधीर मोहिते आणि संदीप सुभाष मोहिते (दोघेही रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कराराचे उल्लंघन करून त्यांनी २३५ शेतकऱ्यांना पाच कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घातला आहे. शहरातील स्टेशन रोडवरील कंपनीचे कार्यालय सील केले आहे.

शेकडो शेतकऱ्यांशी केलेली करारपत्रे ताब्यात घेतली आहेत. कंपनीची इस्लामपूर येथील खासगी बँकेतील दोन खाती सील केली आहेत. इस्लामपूर शहर पोलीस ठाण्यात महारयत अ‍ॅग्रो कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने येथील पोलिसांकडूनही तपास सुरू आहे.

कंपनीचा संचालक संशयित संदीप मोहिते आणि हणमंत शंकर जगदाळे (रा. अंबक-चिंचणी, ता. कडेगाव, जि. सांगली) यांची ११ सप्टेंबरला पोलीस कोठडीची मुदत संपली असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. संशयित आरोपींचा ताबा घेण्यासाठी इस्लामपूर न्यायालयाकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अर्ज केला होता. त्यातील सुधीर मोहिते याला चौकशीसाठी मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कळंबा कारागृहातून ताब्यात घेतले.

त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम आणि शाहूपुरी पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर