शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाच्या दुसऱ्या टप्यातील कामाचा प्रारंभ

By भारत चव्हाण | Updated: June 26, 2023 13:35 IST

सुमारे साडेनऊ कोटींच्या या कामाला उध्दव ठाकरे सरकारच्या काळात मंजूरी मिळाली होती, तर सामाजिक न्याय विभागाकडून हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. 

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाह महाराज समाधी स्मारक स्थळाच्या दुसऱ्या टप्यातील कामाचा शुभारंभ सोमवारी पालकमंत्री दिपक केसरकर व  छत्रपती शाहू यांच्या हस्ते झाला. सुमारे साडेनऊ कोटींच्या या कामाला उध्दव ठाकरे सरकारच्या काळात मंजूरी मिळाली होती, तर सामाजिक न्याय विभागाकडून हा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडीक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता नारायण भोसले, आरोग्याधिकारी डॉ. रमेश जाधव, माजी नगरसेवक अशोक जाधव, जय पटकारे, राहुल चिकोडे व शाहूप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.शहरातील सी वॉर्डातील नर्सरी बाग येथील जागेत पहिल्या टप्यात महापालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाधी स्मारक बांधले आहे. यामध्ये समाधी स्मारकावरील मेघडंबरी, समाधी परिसराभोवती संरक्षक भिंत, लॅण्डस्केपिंग व विद्युतीकरण ही कामे करण्यात आली आहेत. यासाठी महापालिकेने स्वनिधीमधून दोन कोटी ७६ लाख २३ हजार ३१४ इतका निधी खर्च केला आहे. दुसऱ्या टप्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह नुतनीकरण तसेच त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनावर कलादालनाची निर्मिती करणे, समाधी स्थळाला संरक्षक भिंत बांधणे, पादचारी मार्ग करणे, लॅण्डस्केपिंग करणे, स्वच्छतागृहाची सुविधा, वाहनतळाची सुविधा, या परिसरातील ऐतिहासिक समाधी वास्तूंचे संवर्धन, दुरुस्ती व डागडुजी करणे व विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून नऊ कोटी ४० लाख ५६ हजार १०८ इतका निधी महापालिकेस प्राप्त झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती