शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून चेतन नरके लढणार, अरुण नरकेंनी केलं जाहीर

By भीमगोंड देसाई | Updated: December 1, 2022 16:24 IST

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला बराच अवधी असला तरी कोल्हापुरातून लोकसभेसाठी पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 'गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक ...

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला बराच अवधी असला तरी कोल्हापुरातून लोकसभेसाठी पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 'गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक आणि इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी आज, गुरूवारी हे जाहीर केले.

दूग्ध व्यवसाय आणि उत्पादक, ग्राहकांचे प्रश्न केंद्रीय पातळीवर मांडण्यासाठी चेतन नरके खासदार होणे आवश्यक असल्याचे सांगत अरुण नरके यांनी चेतन हे कोल्हापूरलोकसभा मतदारसंघातून लढतील, अशी घोषणा केली. इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डातर्फे येथे जानेवारीमध्ये परिषद होणार आहे. यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत अरुण नरके यांनी ही राजकीय घोषणा केली. उमेदवारी जाहीर केली तरी कोणत्या पक्षातून लढणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.अरूण नरके म्हणाले, लोकसभेत कोल्हापूरचे विविध प्रश्न मांडणारे अभ्यासू लोकप्रतिनिधी हवेत. सहकार, बँकिंग, दुग्ध व्यवसायासह शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्यांचा अभ्यास चेतन यांना आहे. असा अभ्यासू लोकप्रतिनिधी संसदेत असावा. म्हणून त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक