शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहाराचा साठा तपासा : दीपक म्हैसेकर, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 10:51 IST

प्राथमिक शाळांमधील शालेय पोषण आहार साठा तपासणीच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कारण वगळता रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. पूरस्थिती ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देशालेय पोषण आहाराचा साठा तपासा दीपक म्हैसेकर यांच्या सूचना, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द

कोल्हापूर : प्राथमिक शाळांमधील शालेय पोषण आहार साठा तपासणीच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कारण वगळता रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. पूरस्थिती ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.बंद नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी तातडीने पथके तयार करावीत. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तांत्रिक सल्ल्याने तातडीने कार्यवाही सुरू करण्यात यावी, तीन दिवसांत गावांची स्वच्छता करून घ्यावी, याची जबाबदारी गटविकास अधिकारी आणि पंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांवर राहील.तात्पुरती शौचालये उभी करावीत, वैद्यकीय मदत पोहोचवणे, पिण्यासाठी शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न करून जलजन्य आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शालेय पोषण आहारातील खराब धान्याचा तातडीने पंचनामा करून असे साहित्य वापरले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. कर्मचाऱ्यांना रजा देऊ नयेत.ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग, पूल, शासकीय इमारती, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारती यांचे सर्वेक्षण करून नुकसानीची माहिती तयार करावी. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील तलाव, बंधारे यांचे सर्वेक्षण करून सद्य:स्थितीबाबत पाहणी करून तलाव आणि बंधारे यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. धोकादायक तलाव, बंधारे आढळून आल्यास संबंधित विभागांना अवगत करावे, अशाही सूचना या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.

शाळांमध्ये अधिक दक्षता घेण्याची गरजगेले काही दिवस पूरस्थिती असल्याने अनेक शाळा पाण्याखाली होत्या. त्यामुळे या शाळांच्या इमारतींची योग्य पाहणी करून खात्री केल्यानंतरच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसविणे गरजेचे आहे. तसेच आठ-दहा दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे खोल्या झाडूनच शाळा भरविणे सयुक्तिक ठरणार आहे. 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्त