शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आॅईलच्या व्यवहारातून कोल्हापूरच्या व्यापाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:50 IST

आॅईल खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून साडेपाच लाख रुपये आणि धनादेशांचा गैरवापर करून परप्रांतीय व्यापाऱ्याने कोल्हापुरातील व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी रोचला रामुलू रामंजनेयुलू (रा. कुतबुलापूर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) याच्यावर गुरुवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देआॅईलच्या व्यवहारातून कोल्हापूरच्या व्यापाऱ्याची फसवणूक परप्रांतीय व्यापाऱ्यावर गुन्हा

कोल्हापूर : आॅईल खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून साडेपाच लाख रुपये आणि धनादेशांचा गैरवापर करून परप्रांतीय व्यापाऱ्याने कोल्हापुरातील व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी रोचला रामुलू रामंजनेयुलू (रा. कुतबुलापूर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) याच्यावर गुरुवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.अधिक माहिती अशी, फिर्यादी सुशांत प्रकाश देशमुख (वय ४४, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) यांचा आॅईल ट्रेडर्सचा व्यवसाय आहे. ते तेलंगणा येथील व्यापारी रोचला रामंजनेयुलू याच्याकडून होलसेल दरात आॅईल मागवित होते. धनादेशाद्वारे त्यांचा व्यवहार होत होता. पैसे पाठविल्यानंतर आॅईल पाठवून दिले जात असल्याने देशमुख यांचा रोचलावर विश्वास बसला होता.

देशमुख यांनी साडेपाच लाख रुपये आॅईलसाठी दिले होते. तसेच कोरे धनादेश व लेटरहेडही दिले होते. रोचला याने पैसे स्वीकारून आॅईल पाठविलेच नाहीत, तसेच कोऱ्या धनादेशावर रक्कम लिहून ते बँकेत भरले. देशमुख यांच्या खात्यावर रक्कम शिल्लक नसल्याने ते वटले नाहीत. तसेच लेटरपॅडवर आॅईलची मागणी दाखवून पैसे येणे असल्याचे रोचक याने स्वत:च लिहिले होते.

हा प्रकार देशमुख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली. संशयित रोचक हा तेलंगणा राज्यात राहत असल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर