शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सरकारी रुग्णालयाच्या आवारात मिळणार स्वस्त औषधे, मार्चपासून केंद्रे कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 16:10 IST

ब्रँडेड औषधांच्या वाढलेल्या भरमसाठ किमतीमुळे सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक परवड होत आहे. पण आता महाराष्ट्रातील  सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरकारी रुग्णालयाच्या आवारात गरीब रुग्णांच्या खिशाला परवडेल, असे स्वस्त किमतीतील औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, त्यासाठी केंद्र सरकारने जेनेरिक औषध जनऔषधी केंद्र योजना सुरू केली आहे.

ठळक मुद्देसरकारी रुग्णालय आवारात मिळणार स्वस्त औषधे, मार्चपासून केंद्रे कार्यरतशासन निर्णयाने रुग्णांना दिलासा; परिसरातील ब्रँडेड दुकाने बंद

तानाजी पोवारकोल्हापूर : ब्रँडेड औषधांच्या वाढलेल्या भरमसाठ किमतीमुळे सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक परवड होत आहे. पण आता महाराष्ट्रातील  सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरकारी रुग्णालयाच्या आवारात गरीब रुग्णांच्या खिशाला परवडेल, असे स्वस्त किमतीतील औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, त्यासाठी केंद्र सरकारने जेनेरिक औषध जनऔषधी केंद्र योजना सुरू केली आहे.

सरकारी रुग्णालयांच्या आवारात या जेनेरीक औषध दुकानांना तातडीने सुमारे १२० स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आवारातील ब्रँडेड औषध दुकाने बंद करण्याचे आदेशही दिले आहेत.सरकारी रुग्णालयात मोफत औषधोपचार होतात. पण उपलब्ध न होणारी औषधे खासगी दुकानातून विकत आणावी लागतात. त्यामुळे स्वस्त किमतीची औषधे शासन राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी जेनेरिक औषध जनऔषधी केंद्र योजना राबविली आहे. मार्च महिन्यापासून ही औषध दुकाने सुरू होत आहेत. केंद्र सरकारचा औषध निर्माण विभाग व ‘ब्युरो आॅफ फार्मा पीएसयूएस आॅफ इंडिया (बीपीपीआय) नियंत्रणाखाली ही यंत्रणा कार्यरत आहे.जनऔषधी केंद्रेशासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सरकारी रुग्णालय आहेत तेथे ही जनऔषधी केंद्र सुरू होणार आहेत. मुंबईमध्ये जुहू, परळ, सायन, मुंबई सेंट्रल, भायखळा, कळवा (ठाणे) यासह पुण्यात दोन ठिकाणी, नागपूरमध्ये दोन ठिकाणी तसेच कोल्हापूर, मिरज, सोलापूर, नांदेड, अकोला, औरंगाबाद, बारामती, लातूर, चंद्रपूर, धुळे, यवतमाळ, अंबेजोगाई, जळगाव, गोंदिया, वर्धा येथे प्रत्येकी एक केंद्र.विद्यार्थ्यांना रोजगारबी. फार्म, एम. फार्म. विद्यार्थी युवकांना रोजगार मिळावा, या उद्देशाने जनऔषधी योजना सुरू केली आहे. आॅनलाईन अर्ज मागवून औषध केंद्रे दिली आहेत. ही केंद्र सुरू करण्यासाठी मंजूर खुल्या वर्गातील उमेदवारास सरकारकडून २ लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच एस.सी. व एस.टी. प्रवर्गातील उमेदवारास दोन लाखांसह ५० हजार रुपयांची औषधे देण्याची सरकारची योजना आहे.३० ते ७० टक्के स्वस्तब्रँडेड औषधांपेक्षा या योजनेतील औषधे किमान ३० ते ७० टक्के स्वस्त उपलब्ध होणार आहेत.

  • देशात वैद्यकीय महाविद्यालये एकूण : ४७८
  •  राज्यात वैद्यकीय महाविद्यालये एकूण : ५३
  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालये : २५
  • ट्रस्ट व स्वायत्त संस्थेची वैद्यकीय महाविद्यालये : २७
  •  खासगी वैद्यकीय महाविद्यालय : १

शासनाने राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात स्वस्त औषध जनऔषधी केंद्र सुरू करण्याचा घेतलेला निर्णय सर्वसामान्य रुग्णांना दिलासादायक आहे. सरकारी रुग्णालयांत उपलब्ध न झालेली काही औषधे बाहेरून खासगी औषध दुकानांतून घ्यावी लागतात, पण त्यासाठी कोणत्याही डॉक्टरांनी दुकान सुचवायचे नाही, कोणत्या दुकानातून औषध खरेदी करावे, हे रुग्णांनी ठरवायचे आहे.- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, रा. छ. शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर 

 

टॅग्स :medicinesऔषधंCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर