शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कोल्हापूर महापालिकेच्या अनेक विभागांचा भार ‘प्रभारी’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:07 IST

कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या अधिकारी कमी आणि पदे अधिक अशी अवस्था निर्माण झाल्याने प्रत्येक अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची कसरत : अधिकारी कमी, पदे जास्त; रिक्त पदे तातडीने भरणे गरजेचे

तानाजी पोवार ।कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या अधिकारी कमी आणि पदे अधिक अशी अवस्था निर्माण झाल्याने प्रत्येक अधिकाऱ्यांकडे प्रभारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण महापालिकेतच ‘प्रभारीराज’ सुरूअसल्याचा अनुभव येत आहे.

कोल्हापूर शहराचा विकास करताना अनेक पदांची आवश्यकता असते. त्यासाठी विविध विभागांत पदे निर्माण करून त्यामार्फत कामे केली जातात; पण कोल्हापूर महानगरपालिकेत पदे अधिक व व्यक्तीकमी अशी अवस्था निर्माण झाली आहे. सर्वसाधारण सभेपुढे द्यावी लागणारी उत्तरे आणि नगरसेवकांचा आक्रमकपणा यामुळे अनेक अधिकारी अतिरिक्तपदभार घेण्यास तयार नाहीत. त्यापेक्षा निवृत्तीच बरी अशी अनेक अधिकाºयांची धारणा झाली आहे. पण, कर्मचाºयांवर अंकुश ठेवून राहिलेले आयुक्तडॉ. अभिजित चौधरी यांनी या रिक्त पदांचा अतिरिक्त भार अनुभवी अधिकाºयांकडे सोपवून महापालिकेचे ‘प्रभारीराज’वर कामकाज सुरळीत सुरूठेवले आहे.

शहरातील महत्त्वाच्या पदावरही ‘प्रभारीराज’ असल्याची अवस्था आहे. मुख्य आरोग्य अधिकारी पदावर गेले दोन वर्षे प्रभारी पदाचा कार्यभार डॉ. अरुण वाडेकर व डॉ. अरुण परितेकर यांनी सांभाळला. त्यानंतर काही काळ हा पदभार विजय पाटील यांच्याकडे होता; पण या पदाची अनुभवी व्यक्ती शोधताना पुन्हा डॉ. दिलीप पाटील यांचीच ठोक मानधनावर वर्णी लागली. त्याशिवाय पशुवैद्यकीय अधिकारी असणारे विजय पाटील यांच्याकडे प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक पदाचा कार्यभार आहे.

संपूर्ण महापालिकेचे लेखापरीक्षण ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा मुख्य लेखापरीक्षक संजय सरनाईक यांचीही यातून मुक्तता झालेली नाही, त्यांच्याकडे सद्य:स्थितीत मुख्य लेखापरीक्षक पदासह परिवहन व्यवस्थापक आणि सहायक आयुक्तही दोन प्रभारी पदे आहेत. शहरात एखादी अघटित घटना घडल्यानंतर तातडीने कर्मचारी घेऊन उपस्थित राहून प्रामाणिकपणे काम करणाºया अतिशय महत्त्वाचा अग्निशमन दलाच्या मुख्याधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार हा उपमुख्य अग्निशमन दल अधिकारी रणजित चिले यांच्याकडे आहे. अनेक पदांवर प्रभारीराज असल्याचे दिसून येते. याशिवाय दोन उपायुक्त दोन पदे गेली वर्षभर रिक्त असून, ती प्रभारी अधिकाºयांकडे आहेत.पुढील मुख्य पदे, कंसातील अतिरिक्तप्रभारी पदेमुख्य सहायक उपायुक्त मंगेश शिंदे (उपायुक्त)अतिरक्त आयुक्तश्रीधर पाटणकर (उपायुक्त)ठोक मानधनावरील सहायक अधीक्षक रावसाहेब चव्हाण(सहायक अभियंता, यांत्रिकी)सहायक अधीक्षक राम काटकर (परवाना अधीक्षक)अधिकारी सुधाकर चल्लेवाड (कामगार अधिकारी, र. व. का. अधिकारी)सहायक अभियंता नारायण भोसले (उपसंचालक)वरिष्ठ सहायक अभियंता सुरेश कुलकर्णी (जलअभियंता)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार