शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

चॅनलची मक्तेदारी, ग्राहकांची लूट: कमी पसंतीची चॅनल गळ्यात मारण्याचा ‘डाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 11:03 IST

केबल चालकांकडून १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी १५० ते २५० रुपयांमध्ये ४०० पेक्षा जास्त चॅनलचे प्रक्षेपण केले जात होते. यामध्ये ग्राहकांना नको असणारीही चॅनल पाहण्याची वेळ येत होती. ठरावीक चॅनलसाठी सर्व चॅनलचे पैसे देण्याची वेळ त्यांच्यावर येत होती.

ठळक मुद्देत्यांच्याकडून नियमांतील पळवाट काढून ग्राहकांची लूट सुरू आहे.

विनोद सावंतकोल्हापूर : पसंतीनुसार चॅनल निवडीच्या नियमामुळे वास्तविक केबल ग्राहकांना कमी दरात चॅनल मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, चॅनल कंपन्यांच्या खेळीमुळे पूर्वी जी चॅनल १५० ते २५० रुपयांना मिळत होती, ती आता २५० ते ३५० रुपयांमध्येही मिळत नाहीत. त्यामुळे नवीन नियम सुरू करूनही चॅनलची मक्तेदारी कायम आहे. त्यांच्याकडून नियमांतील पळवाट काढून ग्राहकांची लूट सुरू आहे.

केबल चालकांकडून १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी १५० ते २५० रुपयांमध्ये ४०० पेक्षा जास्त चॅनलचे प्रक्षेपण केले जात होते. यामध्ये ग्राहकांना नको असणारीही चॅनल पाहण्याची वेळ येत होती. ठरावीक चॅनलसाठी सर्व चॅनलचे पैसे देण्याची वेळ त्यांच्यावर येत होती. यावर पर्याय म्हणून ‘ट्राय’ने (टेलिव्हिजन रेग्युलेटरी आॅथॉरिटी आॅफ इंडिया) पसंतीनुसार चॅनल घेण्याची सुविधा केली. यामुळे केबल ग्राहकांना कमी दरात चॅनल उपलब्ध होतील, असे चित्र रंगविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र वेगळेच होत आहे. नवीन नियमाचा फायदा कमी, तोटाच जास्त झाला, अशी भावना ग्राहकांतून व्यक्त होत आहे.

  • लोकप्रियसोबत कमी पसंतीची चॅनल खपविण्याची ‘खेळी’

सध्या सर्वच चॅनल कंपन्यांची पॅकेजेस आहेत. यामध्ये १५ ते २० चॅनल आहेत. यात स्पोर्टस, विविध भाषा, मनोरंजन, गीत, इंग्रजी चित्रपट, कार्टुन चॅनलचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये एक किंवा दोनच चॅनल जादा पसंतीची असतात. त्यामुळे कमी महत्त्वाची चॅनल कोणीही घेणार नाही. हे ओळखून कंपनीने जादा पसंतीच्या चॅनलचे दर जादा लावले आहेत; तर जादा पसंतीच्या चॅनलसह पॅकेज घेतले तर ते स्वस्तामध्ये उपलब्ध केले आहे. यामुळे जादा पसंतीच्या चॅनलसोबत कमी महत्त्वाची चॅनल ग्राहकांच्या गळ्यात मारण्याचा डाव चॅनल कंपनीकडून सुरू आहे.

  • २५० रुपये देऊनही महत्त्वाच्या चॅनलपासून वंचित

काही ठरावीक चॅनल लोकप्रिय आहेत. ती स्वतंत्र घेतली तर प्रतिचॅनल २० रुपयांप्रमाणे घेण्याची वेळ येत आहे, अशी जादा पसंतीची केवळ पाच चॅनल घ्यावयाची म्हटल्यास १०० रुपये खर्च करावे लागतात. तसेच मोफत १०० चॅनलसाठी १५३ रुपयांचा खर्च वेगळा आहे. परिणामी पसंतीची सर्व स्वतंत्र चॅनल घेणे परवडत नाही. त्यामुळे ठरावीक चॅनलची पॅकेज घेतली जात आहेत. यामध्ये काही चॅनलपासून ग्राहक वंचित आहेत.

स्पोर्टसची सर्व चॅनल घेणे शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश ग्राहकांना खेळाचे थेट सामने पाहण्यासाठी घरात टी.व्ही. असूनही दुसऱ्यांच्या घरी जाण्याची वेळ येत आहे. याचबरोबर १३० मध्ये जी काही मोफत १०० चॅनल आहेत, ती कमी पसंतीची आहेत; त्यामुळे पसंतीच्या चॅनलसाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा