शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:35 IST

काँग्रेसचे धिरज डोंगळे यांना संधी शक्य, उपाध्यक्षपद 'शेकाप'कडे

सुनिल चौगले आमजाई व्हरवडे : परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष बदलाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे होण्याची शक्यता असून त्यानंतर नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु होणार आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे धीरज डोंगळे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्ष आग्रही आहे.दीड वर्षापुर्वी कारखान्याच्या झालेल्या निवडणूकीत दिवंगत आमदार पी. एन. पाटील, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील, माजी आमदार संपतराव पवार आदींच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्ता कायम राखली होती. पहिल्या वेळी काँग्रेसचे शिवाजीराव पाटील अध्यक्ष तर ए. वाय. पाटील यांचे समर्थक राजेंद्र कवडे यांना संधी मिळाली.साधारणता वर्षाला दोन्ही बदल करुन बहुतांशी जणांना संधी देण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे. त्यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु आहेत. मागील वेळी कॉग्रेसने करवीरला अध्यक्षपद दिले, आता राधानगरी तालुक्याला मिळणार आहे. यामध्ये धीरज डोंगळे व ए. डी. चौगले (शिरगाव) यांची नावे चर्चेत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पाहता धीरज डोंगळे यांना सधी मिळण्याची दाट शक्यता आहे. उपाध्यक्ष पदासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून केरबा पाटील व अक्षय पवार यांच्या पैकी एकाला संधी मिळू शकते.

भोगावतीची सत्ता आली तेव्हा अध्यक्षपदावर दावा केला होता पण आमदार पी.एन.पाटील यांनी समजूत काढून मला थांबविले होते. विधानसभा निवडणुकीनंतर हे पद देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे हे पद मलाच मिळेल. - धीरज डोंगळे, संचालक, भोगावती कारखाना 

‘भोगावती’चे अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलण्याबाबत आघाडीच्या पातळीवर अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. - राहुल पाटील (नेते, सत्तारुढ आघाडी)

अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाची चर्चा खरी आहे. अध्यक्ष बदल करायचा की नाही हे सर्वस्वी काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. पण शेकापला पहिल्यावेळी उपाध्यक्षपद मिळावे ही आमची मागणी होती. काही तांत्रिक अडचणीमुले ते मिळाले नाही. यावेळीही शेकापलाच उपाध्यक्षपद मिळेल. - केरबा पाटील, शेकापचे जेष्ठ नेते, संचालक