शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची ३१ आॅगस्टपासून ‘परिवर्तन’ यात्रा, कोल्हापुरातून रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 17:49 IST

केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पुन्हा राज्यभर रान उठविणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने येत्या ३१ आॅगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात ‘परिवर्तन यात्रा’ सुरू होत आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसची ३१ आॅगस्टपासून ‘परिवर्तन’ यात्रा कोल्हापुरातून रणशिंग: पुण्यात सोमवारी होणार बैठक

कोल्हापूर : केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पुन्हा राज्यभर रान उठविणार आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने येत्या ३१ आॅगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात ‘परिवर्तन यात्रा’ सुरू होत आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे.

या यात्रेच्या नियोजनासाठी पुण्यात काँग्रेस समिती कार्यालयात सोमवारी (दि. २०) दिवसभर आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रेचे आमदार सतेज पाटील हे समन्वयक आहेत.काँग्रेसने यापूर्वी माणिक ठाकरे हे प्रदेशाध्यक्ष असताना ‘जनजागरण’ यात्रा काढली होती. त्यानंतर गेल्या वर्षी दोन्ही काँग्रेसच्यावतीने ‘संघर्ष’ यात्रा काढण्यात आली. आता काँग्रेसने ही ‘परिवर्तन’ यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस हा सक्षम पर्याय आहे व लोकांनी परिवर्तन करावे, असा जनतेला विश्वास देण्यासाठीच ही यात्रा काढण्यात येणार आहे.

कोल्हापुरातून ३१ आॅगस्टला सुरू होणारी ही यात्रा सांगली, कऱ्हाड , सातारा, सोलापूर करून पुण्यात सांगता होईल. ही यात्रा नऊ दिवसांची असून, रोज किमान २२ किलोमीटर जाणार आहे. प्रत्येक दिवशी तीन जाहीर सभांचे नियोजन आहे.

ती प्रत्येक विधानसभा मतदार संघातून जावी, असे नियोजन करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रा झाल्यावर गणेशोत्सव झाल्यावर पुन्हा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ही यात्रा काढण्याचे पक्षाचे नियोजन आहे.केंद्र व राज्यातील सत्तारुढ भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पाढा या यात्रेत वाचला जाणार आहे. मराठा, धनगर, लिंगायत समाजाची आरक्षणाची मागणी, फसलेली कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मुंबईतील शिवाजी महाराजांचे स्मारक, वाढती महागाई, यांसह सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर सरकारवर आसूड ओढला जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. गेल्या चार वर्षांत विविध निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाने खचलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनांत विजयाचा विश्वास निर्माण करण्याचा पक्षाकडून प्रयत्न आहे. लोक त्यांना कसा प्रतिसाद देतात यावर नेत्यांचे व त्या पक्षाचेही भवितव्य ठरणार आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर