शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मुश्रीफसाहेब...कागलमध्ये आता परिवर्तन अटळ - समरजित घाटगे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 19:12 IST

दत्ता पाटील म्हाकवे : मतदारसंघातील लोकं रोज सकाळी दारात यावीत यासाठी गेल्या २५ वर्षांत विद्यमान आमदार यांनी चिकोञाचा प्रश्न ...

दत्ता पाटीलम्हाकवे : मतदारसंघातील लोकं रोज सकाळी दारात यावीत यासाठी गेल्या २५ वर्षांत विद्यमान आमदार यांनी चिकोञाचा प्रश्न मिटविला नाही की मोठे उद्योग आणून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही. सत्तेत असताना घोषणा करायची नाही. माञ, सत्ता गेल्यानंतर निराधारांची पेन्शन दुप्पट करण्याची मागणी केली जाते. त्यामुळे मुश्रीफ साहेब आपल्या राजकारणाचा छुपा अजेंडा लोकांच्या लक्षात आला असून २०२४ मध्ये याच मुद्द्यावर विक्रमी मताधिक्याने परिवर्तन अटळ आहे असा निर्धार भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी व्यक्त केला.पिंपळगाव बुद्रुक (ता.कागल)येथे   बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व भव्य नागरी सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड व निराधारांची पेन्शन वाढीसाठी यशस्वी पाठपुराव्याबद्दल घाटगे यांचा नागरी सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू साखरचे माजी संचालक मारुतीराव पाटील होते. याप्रसंगी शाहू साखरचे संचालक डॉ.डी.एस.पाटील, स्नेहल प्रदीप पाटील यांची भाषणे झाली. यावेळी किसान मोर्चा अध्यक्ष प्रताप पाटील, पी.डी. चौगुले, ए. डी. पाटील, बाबुराव हिरुगडे, राजु जाधव, विश्वास माने, सावंता देवडकर आदी उपस्थित होते.  प्रास्ताविक माजी सरपंच प्रदीप पाटील यांनी केले. स्वागत आकाश पाटील तर खंबाजी पाटील यांनी आभार मानले.जलजीवन मधून जिल्ह्याला २ हजार कोटी. केंद्र सरकारच्या जनजीवन योजनेतून कोल्हापूरातील गरज असणार्या अनेक गावात २हजार कोटींचा निधी आला आहे. यामध्ये कागलमधील ५० गावातील घरा घरापर्यत शुध्द पाणी पोहचणार आहे.तर राज्य शासनाने निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पेंशन दीड हजार रुपये केली असून युवकांना रोजगार देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.त्यामुळे हे सरकार  जनसामान्यांना स्थैर्य देणारे असल्याचे घाटगे म्हणाले ...पण गावात एसटीच पोहचली नाहीमहिलांना शिंदे-भाजप सरकारने एसटी प्रवासात ५० टक्के सवलत देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. माञ,आपल्या गावात अद्याप एसटीच पोहोचली नसल्याची खंत स्नेहल पाटील यांनी व्यक्त केली. याबाबत लवकरच गावात एसटीची सोय करण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही घाटगे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगे