शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाळूमामांच्या नावानं चांगभलं.., मेतकेत भंडारा सोहळ्यात भाविकांची मांदियाळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 17:48 IST

भंडाऱ्याच्या उधळणीत भाविक नाहून गेले

दत्ता पाटील म्हाकवे : मुळक्षेत्र मेतके (ता.कागल) या सदगुरु बाळूमामा यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गावात हालसिध्दनाथ-बाळूमामा भंडारा उत्सवाला भाविकांची मांदियाळी झाली आहे. हा पालखी सबिना याची देही याची डोळा पाहण्यासाठी गेल्या सात दिवसापासून सुरू असणाऱ्या या भंडारा उत्सवासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा सीमाभागातून दीड लाखाहून अधिक भाविक दाखल झाले होते.    सदगुरु बाळूमामांच्या नावानं चांगभलं....श्री हालसिध्दनाथ महाराज की जय...असा अखंड नामघोष ढोल,कैताळाचा निनाद,पालखी सोहळा पाहून हजारो भाविक आत्मतृप्त झाले. भंडाऱ्याच्या उधळणीत भाविक नाहून गेले होते. मंदिर परिसर पिवळा जर्द झाला होता. माघ पौर्णिमेला या भंडारा उत्सवाला बाळूमामांनी परिसरातील चाळीस गावातील नागरिकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. तोच भंडारा आजही भाविक श्रद्धापुर्वक अमाप उत्साहात साजरा करतात. काकड आरती,प्रवचन, किर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, भजन व वालंग (ढोल वादन) यामुळे सात दिवसापासून या पवित्र चिकोत्रा नदीतीरावर भावभक्तीचा मेळाच जमला होता. शुक्रवारी सायंकाळी नाथांचे भक्त भगवान डोणे-वाघापुरे यांचे आगमन झाले. गावच्या मुख्य चौकात बिरदेव व बाळूमामा यांच्या पालखीच्या गाठीभेटी झाल्या. तसेच, मिरज, बेडग, टाकळी, मालगांव, उदगाव, शिरोळ, उमळवाड, टोप, पेठवडगाव, घुणकी, म्हाकवे, कुर्ली, हमिदवाडा, मिणचे,सावर्डे, कारदगा आदी गावातील वालंगे समाजही दाखल झाला होता.यावेळी पालखी पुजन व देवाचा  सभिना, तसेच धनगरी ढोलाचा वालंग व हेडाम खेळण्यात आले. तसेच, सकाळी ज्ञानेश्वरी पारायणची सांगता झाली. तर, महानैवेद्य होवून सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप झाले. सायंकाळी दिंडी सोहळा होवून भंडारा उत्सवाची सांगता झाली. रात्री उशिरापर्यंत भाविक परतत होते.तरुण मंडळासह ग्रामस्थानचे योगदान.. या भंडारा उत्सवाला भावभक्तीची किनार असल्याने मोठी गर्दी होते. सीमाभागातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये. यासाठी सद्गुरू बाळूमामा चँरिटेबल ट्रस्टने नेटके नियोजन केले. तर सर्व भाविकांना महाप्रसादाचा व्यवस्थित लाभ घेता यावा यासाठी तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने परिश्रम घेतले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलं