शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोदामृत उपचारपद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवू : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:33 IST

भारतीय आयुर्वेद ही उपचाराची सर्वोेत्तम पद्धती आहे. भावी पिढी सुदृढ असणे ही काळाची गरज आहे; त्यामुळे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयामध्ये तयार करण्यात आलेली ‘मोदामृत’ ही कुपोषणावरील उपचारपद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू

ठळक मुद्देविश्ववती आयुर्वेद चिकित्सालय, संशोधन केंद्राचे उद्घाटन

कोल्हापूर : भारतीय आयुर्वेद ही उपचाराची सर्वोेत्तम पद्धती आहे. भावी पिढी सुदृढ असणे ही काळाची गरज आहे; त्यामुळे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयामध्ये तयार करण्यात आलेली ‘मोदामृत’ ही कुपोषणावरील उपचारपद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.

विश्वपंढरी येथे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. यावेळी आमदार सतेज पाटील, सुजित मिणचेकर, आनंदनाथ महाराज, रामराया सांगवडेकर, वैद्य समीर जमदग्नी, कैलास काटकर उपस्थित होते.मंत्री पाटील म्हणाले, बालपणातच मुलांचे व्यवस्थित पोषण होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राने संशोधनातून तयार केलेल्या ‘मोदामृत’चा प्रयोग आपण शहरातील २५ झोपडपट्ट्यांमधील ५०० मुलांवर करू. त्याचा चांगला परिणाम दिसला तर जूननंतर १ लाख मुलांपर्यंत ते पोहोचवले जाईल.

आमदार सतेज पाटील म्हणाले, आजाराचे योग्य निदान आणि उपचार ही माणसाची गरज आहे. जिथे सगळे उपचार संपतात तिथे आयुर्वेदाचा दरवाजा उघडतो. आमदार सुजित मिणचेकर यांनीही आयुर्वेद चिकित्सापद्धतीचा शासनाने प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन केले.यावेळी आनंदनाथ महाराज, वैद्य समीर जमदग्नी, कैलास काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल शेलार यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद पानकर यांनी केंद्रात होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. परेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.राजकारणात ठरवून अपघातयावेळी आमदार सतेज पाटील यांनी आम्हा राजकारणी मंडळींना अनेक ताणतणाव आणि धकाधकीला सामोरे जावे लागते; त्यामुळे आमच्यासाठी काही उपचारपद्धती सांगा, असे सांगितले. हा धागा पकडत मंत्री पाटील म्हणाले, राजकारणात ठरवून अपघात केले जातात. राजकीय मंडळींना सकारात्मक विचारांचे इंजेक्शन द्या. आचारसंहितेच्या ४५ दिवसांत एकमेकांवर वाट्टेल ते आरोप करूया; पण निवडणूक संपली की सगळं विसरून एकमेकांना मदत केली पाहिजे असे इंजेक्शन आणि सॉफ्टवेअर तयार करा. त्यांच्या या वाक्यावर एकच हशा पिकला.विश्वपंढरी येथे बुधवारी विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व संशोधन केंद्राचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सतेज पाटील, समीर जमदग्नी, माणिक पाटील-चुयेकर, आनंदनाथ महाराज, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, सुजित मिणचेकर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील