शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

चंद्रकांतदादांचे वर्तन खलनायकासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 00:57 IST

हसन मुश्रीफ : पाच कोटींचा निधी परत घेतला; हीणकस राजकारण

कागल : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे माझ्याबरोबर गतजन्मीचे वैर असल्यासारखे वागत आहेत. मात्र, माझ्या पाठीशी सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद असल्याने ते माझे काहीही करू शकणार नाहीत. मात्र, माझ्यासोबत असणाऱ्या लोकांना आणि सामान्य जनतेला पालकमंत्र्यांच्या या डावपेचात बळी पडावे लागत आहे. गडहिंग्लज नगरपालिकेला दिलेला पाच कोटींचा निधी परत घेण्याचा शासनाचा निर्णय हा पालकमंत्र्यांच्या याच मनोवृत्तीतून झाला आहे. ते सिनेमातील खलनायकासारखे वर्तन करीत आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी येथे केली. कागल नगरपरिषदेच्या वतीने शहरातील १२२ अपंगांना प्रत्येकी चार हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान राखीव निधीतून देण्यात आले. यावेळी धनादेश वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गाडेकर होत्या. उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, छावा अपंग संघटनेचे संतोष मिसाळ, आनंदा (आबा) चव्हाण, प्रकाश गाडेकर प्रमुख उपस्थित होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री हे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे गोरगरीब जनतेचा आणि त्यांचा संबंध आलेला नाही. राजकीय अपयशातून निराश होत ते चुकीचे निर्णय घेत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत गडहिंग्लजच्या सत्ताधारी गटाने मदत केली म्हणून पाच कोटींचा निधी मंजूर करून तो वितरित केला. मात्र, श्रीपतराव शिंदे व आमची युती होऊन गडहिंग्लज कारखान्यात आमचा विजय झाला, म्हणून दिलेले पाच कोटी रुपये परत घेण्याचे हीणकस राजकारण चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. राजकीय द्वेषापोटी कागललाही वगळले आहे. नगराध्यक्षा गाडेकर यांनी स्वागत केले. प्रकाश गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. भैया माने, मनोहर पाटील यांची भाषणे झाली. यावेळी आशाकाकी जगदाळे, संजय चितारी, सुनील माळी, किरण मुळीक, अंजूम मुजावर, रंजना सणगर, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) न्यायालयात जाऊ... मुख्यमंत्र्यांनाही भेटू... आ. मुश्रीफ म्हणाले की, दिलेला पाच कोटींचा निधी परत घेतला जाऊ शकतो का? याबद्दल न्यायालयातही जाण्याचा आपला विचार आहे. ‘ज्या गावच्या बाभळी, त्याच गावच्या बोरी’ याप्रमाणे आम्ही पालकमंत्र्यांना यापुढे प्रत्युत्तर देऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबद्दल भेटू. कोल्हापूर जिल्ह्यात यामुळेच भाजप पक्षाला यश मिळू शकलेले नाही हे निदर्शनास आणून देऊ.