शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादा, वेळ निघून गेल्यावर वक्तव्य करणे चुकीचे, पालकमंत्री सतेज पाटील यांचा चिमटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:12 IST

Politics, Satej Gyanadeo Patil, chandrakant patil, kolhapur पुण्यातील अंतर्गत राजकारणावरून बोलला असाल, पण चंद्रकांतदादा, आता जे सुचले ते २०१९ ला सुचायला हवे होते, आता वेळ निघून गेली आहे, त्यामुळे कोल्हापुरातून निवडणूक लढण्याचे वक्तव्य आता करणे चुकीचे आहे, शब्दांत पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांचा चिमटा काढला.

ठळक मुद्देचंद्रकांतदादा, वेळ निघून गेल्यावर वक्तव्य करणे चुकीचे, पालकमंत्री सतेज पाटील यांचा चिमटापुण्यातील अंतर्गत राजकारणाचा संदर्भ

कोल्हापूर : पुण्यातील अंतर्गत राजकारणावरून बोलला असाल, पण चंद्रकांतदादा, आता जे सुचले ते २०१९ ला सुचायला हवे होते, आता वेळ निघून गेली आहे, त्यामुळे कोल्हापुरातून निवडणूक लढण्याचे वक्तव्य आता करणे चुकीचे आहे, शब्दांत पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांचा चिमटा काढला.कोल्हापुरातून निवडून आलो नाही तर हिमालयात निघून जाईन, असे वक्तव्य सोमवारी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले होते. त्याबद्दल बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापुरात १० पैकी आठ आमदार महाविकास आघाडीचे आहेत.

दोनच अपक्ष आहेत, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना निवडणूक लढवायची म्हटल्यावर त्यांच्यासाठी कोण राजीनामा देऊन जागा रिकामी करून देणार हा प्रश्नच आहे. त्यांना मानणाऱ्या अपक्षांनी जागा मोकळी करून द्यावी, असे आम्ही म्हणणार नाही, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आम्ही बोलणे योग्य होणार नाही.चंद्रकांत पाटील यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक पुण्यातील कोथरूडमधून लढविली. त्यांना जिंकायचा एवढा विश्वास होता तर त्याचवेळी त्यांनी निर्णय घेऊन कोल्हापुरातून निवडणूक लढवायला हवी होती. आता विधानसभेची निवडणूक नाही, त्यामुळे कोणी कुठून निवडणूक लढवावी याबद्दल चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. पुण्यातील पक्षांतर्गत राजकारण आणि तेथील समीकरणांतून स्वत:ची ताकद दाखविण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले असावे असे वाटते, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर