शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील बोलले अन् सत्ता गेली, तसे मुश्रीफ यांचे व्हायला नको-श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:53 IST

उत्तूर : गडहिंग्लजच्या पाणी परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी उंचगी प्रकल्पात पाणीसाठा होईल असे बोलले. दादा बोलले अन् सत्ता गेली. ...

ठळक मुद्देतुमच्या कारकीर्दीत पाणी साठेल त्यापूर्वी पुनर्वसन व्हायलाच हवे. आंबेओहळ निर्धार परिषदेत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचा इशारा

उत्तूर : गडहिंग्लजच्या पाणी परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी उंचगी प्रकल्पात पाणीसाठा होईल असे बोलले. दादा बोलले अन् सत्ता गेली. तसं ग्रामविकास हसन मुश्रीफ यांचे व्हायला नको, तत्पूर्वी आंबेओहळ धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा, असा इशारा माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी दिला.उत्तूर (ता. आजरा) येथील आंबेओहळ धरणग्रस्तांच्या आयोजित निर्धार परिषदेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.शिंदे म्हणाले, प्रकल्पाचे पाणी पुनर्वसनाशिवाय अडविल्यास धरणग्रस्त खड्डे काढून पाण्यात उभे राहतील. मंत्री झाले म्हणजे धरण झालं असे कोणी समजू नये. धरणग्रस्तांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना क्षमा नाही. खोटा पंचनामा करणाऱ्यांना काय शिक्षा करणार ?आंबेओहळ प्रकल्पाची लढाई आता सुरू झाली आहे. पाणी मुश्रीफ यांच्या कारकिर्दीत अडविले जाईल. पण, कधी पुर्नवसन होईल तेव्हा. अन्यथा चंद्रकांत पाटील यांच्यासारखी सत्ता जाईल असे सुतोवाच शिंदेंनी केले. कॉ. संपत देसाई म्हणाले, परिषदेने संघटनेला बळ मिळाले आहे. संघटीत राहून पुनर्वसन करुन घेवूया. सामूहिक वचन पाळून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रखडलेले प्रश्न सोडवूया.कॉ. अशोक जाधव म्हणाले, मुश्रीफ यांनी घळभरणी करतानाचा कायदा याचा अभ्यास करावा मगच बोलावे. पुनर्वसन अगोदर मग घळभरणी हा कायदा असताना मुश्रीफ यांनी आढावा बैठकीत धरणग्रस्तांची दिशाभूल केली.धरणात पाणी तुंबेल ते धरणग्रस्तांच्या परवानगीनेच कुणाच्या तरी प्रतिष्ठेसाठी पाणी तुंबवू नका असा इशाराही कृष्णा खोरेंच्या अधिकाऱ्यांना दिला.शंकर पावले म्हणाले, २००२-०३ सालच्या टिपण्णीत धरणग्रस्तांसाठी ७०० हेक्टर जमीन होती. या जमिनी कुठे गेल्या यांची चौकशी झाली पाहिजे. परिषदेत जि.प. सदस्य उमेश आपटे, कॉ. संजय तर्डेकर, संतोष बेलवाडकर, बाळेश नाईक, सुरेश मिटके, सदानंद व्हनबट्टे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी गडहिंग्लजचे नगरसेवक उदय कदम, राजू देशपांडे, सागर सरोळकर, अमोल बांबरे आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते. मागण्यांचे निवेदन कृष्णा-खोरेचे अधिकारी यांना देण्यात आले.

परिषदेच्या मागण्याधरणग्रस्तांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, व पुनर्वसन अधिकारी समवेत व्यापक बैठक घ्या, संकलन दुरुस्ती करा, संपादित जमिनीवरील स्थगिती आदेश उठवा, भूखंड वाटप तातडीने करा, जमिनी वर्ग -१ करून द्या, पॅकेज संदर्भात सक्ती नको, करपेवाडी जमिनीचा प्रश्न तातडीने सोडवा, न्यायालयाच्या निर्णयाचे अवलोकन करा, प्रकल्पग्रस्तांना वाटप झालेल्या जमिनी कसण्यासाठी अडथळे येत आहेत ते दूर करा.

 

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर