शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
3
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
4
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
5
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
6
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
7
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
8
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
9
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
10
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
11
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
12
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
13
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
14
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
15
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
16
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
17
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
18
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
19
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
20
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांच्यामुळे कोल्हापूरला प्रथमच प्रदेशाध्यक्षपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 11:02 IST

राज्य मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे मंत्री अशी राजकीय ताकद असलेल्या महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोल्हापूरला प्रथमच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. कोल्हापूरचे जावई असलेले अमित शहा हे भाजपचे देशाचे अध्यक्ष असून, मंत्री पाटील यांच्या निवडीने एक सुखद योगायोग जुळून आला आहे.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांच्यामुळे कोल्हापूरला प्रथमच प्रदेशाध्यक्षपदमराठा आरक्षणप्रश्नी महत्त्वाची भूमिका

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळातील क्रमांक दोनचे मंत्री अशी राजकीय ताकद असलेल्या महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोल्हापूरला प्रथमच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. कोल्हापूरचे जावई असलेले अमित शहा हे भाजपचे देशाचे अध्यक्ष असून, मंत्री पाटील यांच्या निवडीने एक सुखद योगायोग जुळून आला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या यशात मंत्री पाटील यांनी लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्यामुळेच त्यांना ही सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली. हे पद मिळाल्याने त्यांचे मुख्यमंत्रिपदाच्या वाटचालीत एक पाऊल पुढे पडले. कोल्हापूरला यापूर्वी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून श्रीपतराव शिंदे यांना संधी मिळाली होती. माजी खासदार जयवंतराव आवळे हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते.भुदरगड तालुक्यातील गिरणी कामगाराचा किटलीबॉय असलेला मुलगा ते राज्यातील दोन नंबरचा मंत्री व आता प्रदेशाध्यक्ष अशी मंत्री पाटील यांची राजकीय वाटचाल आहे. ते सध्या कोल्हापूर व पुण्याचे पालकमंत्री आहेत. यापूर्वी त्यांनी जळगावचे पालकमंत्रिपदही सांभाळले. त्यांनी कृषी आणि मदत व पुनर्वसन ही खातीही सांभाळली आहेत. विधानसभा निवडणूक होईपर्यंत रावसाहेब दानवे यांच्याकडेच हे पद राहील, अशी शक्यता होती; परंतु पक्षाने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी दिली.

पाटील यांना ही संधी मिळण्यात दोन-तीन महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. मंत्री पाटील यांची जडणघडण ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत झाली आहे. त्यामुळे संघातूनही त्यांना कायमच बळ मिळाले आहे. गेल्या साडेचार वर्षांत त्यांच्याकडे महत्त्वाची व मोठी आर्थिक उलाढाल असलेली मंत्रिपदे असून त्यांच्याबद्दल फारशी तक्रार झालेली नाही.

आता जरी रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष होते तरी डॉ. सुजय विखे, रणजित निंबाळकर यांच्यापासून ते रंजना कूल यांच्यापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांना भाजपमध्ये आणण्यात व त्यांना विश्वास देऊन पक्षात त्यांचा सन्मान करण्यात मंत्री पाटील यांचा वाटा महत्त्वाचा राहिला. मंत्री पाटील यांच्या डोक्यात पक्षाची संघटनात्मक ताकद कशी वाढवायची, याचे आडाखे सतत सुरू असतात. त्याचा पक्षालाही नक्कीच फायदा झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्यानंतर विधानसभेलाही चांगले यश मिळविण्याचे पक्षाचे प्रयत्न आहेत. ही निवड त्या घडामोडींचाच भाग मानली जाते. या पदासाठी भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांचेही नाव चर्चेत होते; परंतु त्यांची पश्चिम महाराष्ट्र सोडून अजून तेवढी ओळख प्रस्थापित झालेली नाही. मंत्री पाटील यांची ओळख मात्र आता राज्यभर झाली असल्याने तीदेखील त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली.मराठा आरक्षणप्रश्नी महत्त्वाची भूमिकामंत्री पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोन सत्ताकेंद्रे होण्याची भीती नाही. ‘साधा कार्यकर्ता असो, आमदार असो की मंत्री. मी म्हणजे कोरे पाकीट आहे. पक्ष त्यावर जे लिहील त्यानुसार माझी वाटचाल राहील,’ असे ते कायम सांगत असतात.

मराठा आरक्षण आंदोलन असो किंवा शिवसेनेबरोबरचा समन्वय असो; त्यांनी यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. विधानसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षण लागू केल्याचा राजकीय फायदा भाजप नक्कीच उठविणार आहे. त्या दृष्टीनेही मराठा समाजातील नेत्यास पक्षाची संघटनात्मक जबाबदारी दिली असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर