शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Maharashtra Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत जाधव यांना ‘अदृश्य हातां’चे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 13:56 IST

कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात तगडा उमेदवार मिळत नसल्याचे सुरुवातीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. ऐनवेळी धावपळ करून काँग्रेसची उमेदवारी घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले उद्योजक चंद्रकांत जाधव यांना अनेक ‘अदृश्य हात’ मदत करण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देचंद्रकांत जाधव यांना ‘अदृश्य हातां’चे पाठबळनिवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात तगडा उमेदवार मिळत नसल्याचे सुरुवातीचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. ऐनवेळी धावपळ करून काँग्रेसची उमेदवारी घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले उद्योजक चंद्रकांत जाधव यांना अनेक ‘अदृश्य हात’ मदत करण्याची शक्यता आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधी भाषणांचा रोख ठेवला होता. त्यानुसार क्षीरसागर यांनीही कोल्हापुरात भाजपविरोधी ठाम भूमिका घेतली होती; मात्र लोकसभेच्या निकालानंतरही भाजपसमर्थक आणि क्षीरसागर यांच्यामध्ये परस्परविरोधी आरोप प्रत्यारोप सुरूच होते. या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच ‘उत्तर’मधून निवडणूक लढविणार अशी चर्चा होती. मधुरिमाराजे यांचीही उमेदवारीची चर्चा होती; परंतु या सर्व घडामोडीत एकीकडे राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर झाली तरी काँग्रेसचा उमेदवार ठरत नव्हता, अशी परिस्थिती होती. परंतु गेल्या चार दिवसांमध्ये घडामोडी घडल्या आणि चंद्रकांत जाधव हे काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यामध्ये यशस्वी झाले.त्यांना या सर्व घडामोडींत काँग्रेसच्या नेत्यांचे चांगले सहकार्य मिळाले आहे; त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेनेतीलच क्षीरसागर यांचे पारंपरिक विरोधक यांच्यासह अनेक अदृश्य हात जाधव यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी करण्याची शक्यता आहे. हे होत असताना ताराराणी आघाडीचे सत्यजित कदम जे गेल्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते, ते जनसुराज्यमधून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. जाधव हे उद्योजक असून, विविध औद्योगिक संघटनांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. फुटबॉल क्षेत्रामध्ये तर त्यांनी अनेक स्पर्धा प्रायोेजक त्व घेणे, खेळाडूंना दत्तक घेणे, संघांना पाठबळ देणे, हे काम गेली अनेक वर्षे सुरू ठेवले आहे. जाधव यांचे राजकारणापलिकडील व्यक्तिमत्त्व या निवडणुकीत रंग भरण्याची शक्यता आहे.चंद्रकांत पाटील युती धर्म पाळण्याचीच शक्यतालोकसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्याविषयी आपुलकी जाहीरपणे व्यक्त करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी शेवटच्या टप्प्यात मात्र महाडिक यांच्याविरोधात टोकाची भूमिका घेऊन वातावरणनिर्मिती केली. जरी क्षीरसागर आणि त्यांच्यामध्ये काही खटके उडाले असले तरी भविष्यातील राजकीय वाटचालींचा विचार करून याहीवेळी उद्धव ठाकरे यांना बोलण्याची संधी न देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे क्षीरसागर यांच्याच पाठीशी ताकद लावण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेसvidhan sabhaविधानसभा