शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

कोल्हापूर जिल्ह्यात मतदान करण्यात चंदगड, शाहूवाडी मागे; मतदान वाढविण्याचे आव्हान

By समीर देशपांडे | Updated: April 30, 2024 12:40 IST

जिल्ह्यातील ३८७ मतदान केंद्रांवर ६० टक्केपेक्षा कमी मतदान

समीर देशपांडेकोल्हापूर : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत चंदगड आणि शाहूवाडी तालुका मतदान करण्यात मागे पडला आहे. या दोन्ही तालुक्यात प्रत्येकी ८५ मतदान केंद्रांवर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे ६० टक्केपेक्षा कमी मतदान झाले आहे. जिल्ह्यात १० विधानसभा मतदारसंघात एकूण ३८७ मतदान केंद्रांवर याच पद्धतीने कमी मतदान झाले असून ते वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.गेल्यावेळीही मतदान वाढावे यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात त्यावेळी धनंजय महाडिक यांचा पराभव करून संजय मंडलिक विजयी झाले होते. तर हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला होता. कोल्हापूरमध्ये १५ तर हातकणंगले मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात होते. महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी गतवर्षीपेक्षा घटलेली आहे. त्यामुळे उर्वरित टप्प्यातील निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी सुधारावी यासाठी प्रशासनही प्रयत्न करत आहे.याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ६० टक्केपेक्षा ज्या मतदान केंद्रावर मतदान कमी झाले आहे अशा केंद्रांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी ‘आम्ही कमी मतदान केले आहे’ असे फलक लावण्यात येत असून यंदा तरी मोठ्या संख्येने मतदान करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

येथे झाले ६० टक्केपेक्षा कमी मतदान 

अ.नविधानसभा तालुका नागरी केंद्रे ग्रामीण केंद्रे एकूण
१ चंदगड आजरा०० २० २० 
  गडहिंग्लज००४०४०
  चंदगड०१२४२५
राधानगरीराधानगरी००१९१९
  भुदरगड०२१११३
  आजरा०९०९१८
कागलकागल००००००
  आजरा००१३१३
  गडहिंग्लज१६०२१८
४ कोल्हापूर दक्षिणकोल्हापूर शहर२९००२९
  करवीर०००५०५
करवीरपन्हाळा०००८०८
  गगनबावडा०१०९१०
  करवीर०००१०१
कोल्हापूरउत्तर५६००५६
शाहूवाडीशाहूवाडी००८०८०
  पन्हाळा०००५०५
हातकणंगलेहातकणंगले००००००
९ इचलकरंजीहातकणंगले०९०२११
१० शिरोळशिरोळ१४०२१६

कागल, हातकणंगलेची बाजीकागल विधानसभा मतदारसंघात कागल, गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यातील मतदान केंद्रांचा समावेश आहे. संजय मंडलिक हे कागल तालुक्यातीलच असल्याने या तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. हीच परिस्थिती हातकणंगले तालुक्यातील आहे. हातकणंगले तालुक्यातील उमेदवार असलेले धैर्यशील माने रिंगणात होते. त्यामुळे या तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर ६० टक्केपेक्षा अधिक मतदान झाले आहे.

कमी मतदानाची कारणे

  • पक्षबदलूपणाला मतदान कंटाळले
  • प्रचंड उष्मा
  • उमेदवारांबद्दलची नाराजी
  • एकूण व्यवस्थेबद्दलची अनास्था

गतवेळच्या मतदानाची स्थिती                                  कोल्हापूर       हातकणंगलेएकूण मतदार              १८, ८०.४९६      १७,७६,५५५पोस्टल मतदान           ५,४४४                ५,९५५एकूण झालेले मतदान  १३,३०,८५२        १२,५२,२११

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४