गडहिंग्लज : पंचायत क्रीडा विभागीय फुटबॉल स्पर्धेत साताऱ्याच्या मुले संघाने, तर कोल्हापूरच्या मुली फुटबॉल संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजेतेपद पटकाविले. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.क्रीडा उपसंचालक कार्यालयातर्फे झालेल्या या स्पर्धेत सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील १० संघांनी भाग घेतला.१६ वर्षांखालील गटात साताराच्या मुले संघाने रत्नागिरी संघाचा एकमेव गोलने पराभव करून विजेतेपद पटकाविले. साताऱ्याच्या शोएब शेखने निर्णायक गोल नोंदविला. याच गटात तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत सांगलीने कोल्हापूरला पराभूत केले. सिंधुदुर्गचे आव्हान पहिल्याच सामन्यात संपुष्टात आले.मुलींच्या गटात यजमान कोल्हापूरने साताऱ्याला एका गोलने नमवून विजेतेपद पटकावले. कोल्हापूरच्या अधिका भोसले हिने निर्णायक गोल नोंदविला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत सांगली जिल्ह्याला रत्नागिरीकडून ३-२ ने पराभव पत्करावा लागला. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीत असणारा हा सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये झाला.क्रीडाधिकारी बाजीराव देसाई, आप्पासाहेब कोड्ड, प्रशिक्षक दीपक कुपन्नावर, चंद्रकांत गुरव, अनिल पाटील, मुख्याध्यापक आर. के. कोडोली यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षिसे देण्यात आली.निखील खन्ना, योगेश धामोणे, महेश सुतार, सूरज तेली, समीर किल्लेदार यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धेतून रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागाचा संघ जाहीर करण्यात आला. (प्रतिनिधीगडहिंग्लज येथे विभागीय पायका फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या कोल्हापूरच्या मुलींच्या संघाला बक्षीस देताना आप्पासाहेब कोड्ड. शेजारी बाजीराव देसाई, चंद्रकांत गुरव, सचिन मगदूम, सुरेश मगदूम, अनिल पाटील उपस्थित होते.
सातारा, कोल्हापूरला विजेतेपद
By admin | Updated: November 10, 2014 00:47 IST