शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

काँगे्रस-राष्ट्रवादीसमोर महाआघाडीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 23:18 IST

पडझड रोखण्याचे राष्ट्रवादीपुढे आव्हान : विधानसभेच्या तिन्ही मतदारसंघांचे भवितव्य तीन जिल्हा परिषद मतदारसंघावर अवलंबून

ज्योतिप्रसाद सावंत --आजरा तालुक्यात जिल्हा परिषद जागांवर आजतागायत काँगे्रस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे; परंतु विधानसभेपाठोपाठ आजरा साखर कारखान्यात महाआघाडीने मारलेली बाजी, ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप शाखांच्या माध्यमातून सुरू असलेली पेरणी व काँगे्रस राष्ट्रवादीची सुरू असलेली पडझड यामुळे महाआघाडीचे नेटके आव्हान आजरा तालुक्यात काँगे्रस-राष्ट्रवादीसमोर राहणार आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, शिक्षण व बांधकाम समितीपदी मुकुंदराव आपटे, उपाध्यक्ष बळिराम देसाई, बांधकाम समिती सभापतिपदी जयवंतराव शिंपी यांना, तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी मनीषा गुरव यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, अलका शिंपी, उज्ज्वला धुरे, निर्मला व्हनबट्टे यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर बदलते राजकीय संदर्भ पाहता आजरा साखर कारखान्यानंतर पुन्हा एकवेळ जिल्हा परिषदेत राजकीय संघर्ष पाहण्यास मिळणार आहे.आजरा तालुक्याचे तिन्ही जिल्हा परिषद मतदारसंघ तीन विधानसभा मतदारसंघांत विभागले आहेत. आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ भुदरगड-राधानगरी विधानसभा मतदारसंघास जोडला आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करीत आहेत; परंतु विधानसभेनंतर आजरा साखर कारखान्यात राष्ट्रवादी विरोधात या मतदारसंघाने कौल दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत महाआघाडीचे जबर आव्हान राष्ट्रवादीसमोर राहणार आहे. राष्ट्रवादीतून जयवंतराव शिंपी, मुकुंदराव देसाई हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार, तर महाआघाडीतून मात्र तुल्यबळ उमेदवाराचा शोध राहणार आहे.उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात आजरा कारखाना निवडणुकीत पारंपरिक विरोधक उमेश आपटे व वसंतराव धुरे एकत्र आल्याने या मतदारसंघात राष्ट्रीय काँगे्रस-राष्ट्रवादीचे पारडे सद्य:स्थितीस थोडे जड दिसत आहे. आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची ताकदही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वापरली जाणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतरच या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. हा मतदारसंघ कागल-गडहिंंग्लजला जोडला गेल्याने कागलची आगामी विधानसभेची समीकरणे बऱ्याचअंशी या जिल्हा परिषद मतदारसंघावर अवलंबून राहणार आहेत.कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघ यावेळी रंगतदार लढत होणार आहे. पंचायत समिती सभापती विष्णुपंत केसरकर, माजी सदस्या अंजनाताई रेडेकर, विद्यमान सदस्या संजीवनी गुरव, उद्योगपती रमेश रेडेकर आणि वेळ आलीच, तर मुकुंदराव देसाई, आजरा साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता रेडेकर, अशी इच्छुकांची मोठी यादी या मतदारसंघात आहे. सर्वांनीच या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत नेहमीच या विभागाने साथ दिली आहे; परंतु आजरा साखर कारखाना निवडणुकीत रमेश रेडेकर, विष्णुपंत केसरकर यांनी महाआघाडीच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीचे निश्चितच नुकसान झाले आहे. निवडणुकीपूर्वी डागडुजी न झाल्यास राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेबरोबरच विधानसभा निवडणुकीतही मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.गत निवडणुकांवेळी राज्यात व केंद्रात काँगे्रस-राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, यावेळी संदर्भ पूर्णपणे बदलले आहेत. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना चांगलेच पाठबळ देण्यास सुरुवात केली आहे. गावागावांत शाखा व विकासकामांचा धडाका लावला आहे. रवींद्र आपटे, अशोक चराटी ही मंडळी महाआघाडीच्या माध्यमातून सक्रिय आहेत. राजकीय फासे महाआघाडीच्या बाजूने पडू लागल्याने महाआघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे.