शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

बंडखोरी रोखण्याचे पक्षांसमोर आव्हान

By admin | Updated: February 7, 2017 23:33 IST

हातकणंगले तालुका : स्वबळाचा नारा; कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या

दत्ता बिडकर---हातकणंगले तालुक्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची कोणाशी युती नाही आणि कोणाशीही आघाडी नाही. सर्वच स्वबळाचा नारा देत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. म्हणून प्रत्येक मतदारसंघात बंडखोरीचे प्रमाण वाढले आहे. बंडोबांना थंड करण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.हातकणंगले तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा अर्ज भरण्याचा कालावधी संपला आहे. तालुक्यातील ११ जिल्हा परिषदेसाठी १0९ आणि २२ पंचायत समितीसाठी तब्बल २0१ अर्ज दाखल झाले आहेत. नेतेमंडळींनी सर्वच इच्छुकांना अर्ज दाखल करा, मग काय ते बघू, असा शब्द दिला होता. अर्ज आॅनलाईन भरण्याची प्रक्रिया किचकट असतानाही कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पदरमोड करून अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवसी, तर विक्रमी अर्ज दाखल झाल्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे. इच्छुकांनी नेते मंडळींचा आदेश डावलून आपल्या सोयीनुसार अर्ज दाखल केले आहेत.तालुक्यातील कबनूर, कोरोची, पट्टणकोडोली, हुपरी आणि रेंदाळ या पाच जिल्हा परिषद मतदारसंघांत प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस पक्षाविरुद्ध बंड पुकारले आहे. आवाडे यांनी कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी स्थापन करून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर जयवंतराव आवळे यांनी यापैकी पट्टणकोडोली, हुपरी आणि रेंदाळमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार जाहीर करून आवाडे यांच्यावर कुरघोडी केली आहे. या पाच मतदारसंघांत आवाडे यांच्या आघाडी बरोबर काही मतदारसंघांत शिवसेनेची साथ आहे. तर काही मतदारसंघांत स्वाभिमानी शेतकरी संघटना बरोबर घेतली आहे. यामुळे शिवसेनेने जाहीर केलेली स्वबळावर लढण्याची भाषा कार्यकर्त्यांना रुचणारी नाही, हे स्पष्ट होते. पट्टणकोडोली मतदारसंघात शिवसेना व स्वाभिमानी आवाडे यांच्याबरोबर, तर हुपरी, रेंदाळमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमुळे कार्यकर्ते उघड नाराजी व्यक्त करीत आहेत.तालुक्यात राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष एम. वाय. पाटील आणि तालुका अध्यक्ष दशरथ पिष्टे यांनी जाहीर केले होते. मात्र, अर्ज दाखल करण्याचा कालावधी संपला, तरी अर्ज दाखल केले नाहीत. राष्ट्रवादी कार्यकर्ते सैरभैर झाले असून, काही आवाडेंच्या तंबूत, तर काही भाजपच्या तंबूत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व ठिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागते आहे. तालुक्यात अरुण इंगवले आणि धैर्यशील माने म्हणजेच राष्ट्रवादी, असे समीकरण ओळखून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी संपविण्यासाठी या दोघांना भाजपकडे ओढून हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ गोठविण्याचे काम फत्ते केले आहे.आदेश डावलून कार्यकर्ते कार्यारतनेते मंडळीकडून स्वबळाची भाषा बोलली जात असली तरी तालुक्यातील सर्वच मतदारसंघांची स्थिती पाहता नेते मंडळींचा आदेश डावलून कार्यकर्ते स्वत:चा विचार करून स्थानिक पातळीवर युती आणि आघाडी करून अर्ज दाखल करीत असल्याने अर्ज माघारीनंतर नेते विरुद्ध कार्यकर्ते, असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आॅनलाईन अर्ज भरणी : हजारांतआॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काही नेट कॅफे आणि संगणकचालकांनी उमेदवारांची गरज ओळखून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी हजार ते पाचशे रुपयांपर्यंत रक्कम घेतली. शेवटच्या दिवसी तर आॅनलाईनचा दर चक्क चार ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. यावरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे अज्ञान स्पष्ट झाले आहे.