शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कडगावचा गड भेदण्याचे के.पीं.ना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:03 IST

शिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत भुदरगड तालुक्यातील कडगाव गट क्रमांक सहामध्ये दिनकरराव जाधव आणि के. जी. नांदेकर यांचा अभेद्य गड भेदताना माजी आमदार के. पी. पाटील गटाला जिवाचे रान करावे लागणार आहे.गेल्या पंचवीस वर्षांचा इतिहास पाहता या गटावर दिनकरराव जाधव ...

शिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत भुदरगड तालुक्यातील कडगाव गट क्रमांक सहामध्ये दिनकरराव जाधव आणि के. जी. नांदेकर यांचा अभेद्य गड भेदताना माजी आमदार के. पी. पाटील गटाला जिवाचे रान करावे लागणार आहे.गेल्या पंचवीस वर्षांचा इतिहास पाहता या गटावर दिनकरराव जाधव आणि के. जी. नांदेकर गटाचे प्राबल्य आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांच्या गटातून गतवेळचे संचालक धनाजीराव देसाई व के. ना. पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, तर दौलतराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज छाननीतून बाद झाल्याने आता के. ना. पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे. आमदार आबिटकर गटातून दिनकरराव जाधव आणि के. जी. नांदेकर यांची उमेदवारी निश्चित आहे. दौलतराव जाधव यांनी कारखान्यात ऊस पुरवठा न केल्याच्या कारणावरून त्यांचा अर्ज बाद झाला; परंतु त्यांनी वेळोवेळी ऊस नेण्यासाठी कारखाना प्रशासनाकडे अर्ज दाखल केले होते. पण, त्यांचा ऊस नेला गेला नाही. माजी आमदार के.पीं.चे निकटवर्तीय असणाºया या नेत्यांना नामुष्कीजनक माघार घ्यावी लागली.कारखान्याच्या गतनिवडणुकीत माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या विरोधात के. पी. पाटील गटातून के. जी. नांदेकर यांनी विक्रमी मतांनी विजय मिळविला होता. यावेळी प्रथमच दिनकरराव जाधव यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. के. जी. नांदेकर हे एखादी पंचवार्षिक वगळता १९७९ पासून कारखाना संचालक मंडळात कार्यरत आहेत. ते एकदाही पराभूत झालेले नाहीत; पण माजी आमदार के. पी. पाटील आणि के. जी. नांदेकर यांच्यातील तणाव वाढत गेला. ‘के.जीं.’नी हुतात्मा वारके सूतगिरणीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला व ते आमदार आबिटकर गटात सामील झाले. जि. प. आणि पं. स.च्या निवडणुकीत जि.प.ची एक व पं.स.च्या दोन्ही जागेवर विक्रमी मताधिक्य मिळविले आहे. यावेळी अनेकांनी के.जी. आणि दिनकरराव जाधव गट एकत्र राहतील का? अशी शंका उपस्थित केली होती; परंतु ती शंकाच ठरली. मागील जि.प.च्या निवडणुकीत केजी हे केपी यांच्या गटात होते. त्यावेळी जि.प.ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती. म्हणजे जिकडे केजी तिकडे विजय हे समीकरण झाले आहे. या जमेच्या बाजू पाहता माजी आमदार के. पी. पाटील गटाला या गटातील निवडणूक अतिशय अडचणीची ठरणारी आहे. सध्या के. पी. पाटील यांच्यासोबत ‘गोकुळ’चे संचालक विलास कांबळे, ईश्वरा डाकरे, काकासो देसाई, काशिनाथ देसाई, प्रकाश डेळेकर, तमास पिंटो, बाळासाहेब कोटकर ही मंडळी आहेत. दिनकरराव जाधव आणि के. जी. नांदेकर यांच्यासोबत त्यांचे गट आणि आमदार आबिटकर गटातील संदीप वरंडेकर यांच्यासारख्या तरुण नेत्यांची फौज आहे. या विभागातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पडसाद या निवडणुकीवर उमटण्याची शक्यता आहे. गावागावांत अंतर्गत गटबाजीला ऊत आला असून, कोण कुणाच्या गटात आहे, हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. उमेदवारी नाकारल्यावर कोण कोठे जाणार हे सांगणे कठीण आहे. त्यांची समजूत काढताना नेत्यांचे कसब पणाला लागणार आहे. या गटात गतनिवडणुकीतील विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी के. जी. नांदेकर व दिनकरराव जाधव यशस्वी होणार? की, माजी आमदार के. पी. पाटील यांचा गट इथले प्राबल्य मोडीत काढणार हे लवकरच समजेल.ठळक मुद्दे : सध्या या मतदारसंघात ५४ गावे असून, ८ हजार ६५ सभासद पात्र आहेत. ४०० हून अधिक मतदारसंख्या असलेली तिरवडे आणि कडगाव ही दोन गावे आहेत. या जिल्हा परिषद मतदारसंघावर दिनकरराव जाधव गटाने बाजी मारली. कारण त्यांच्यासोबत के. जी. नांदेकर होते. गेली पंचवीस वर्षे सलग संचालक होण्याचा के. जी. नांदेकर यांचा इतिहास आहे, तर सलग सोळा वर्षे अध्यक्षपद भूषविण्याचा मान माजी आमदार दिनकरराव जाधव यांना मिळाला आहे.गटातील समाविष्ट गावे ५४सोनारवाडी, मडूर, शेळोली, तिरवडे, वेंगरुळ, कडगाव, नितवडे, करडवाडी, दोनवडे, शेणगाव, वासणोली, ममदापूर, नांदोली, सोनुर्ली, पाचर्डे, नवले, कुंभारवाडी, राणेवाडी, वरपेवाडी, फये, खेडगे, पडखंबे, एरंडपे, गडबिद्री, मठगाव, मेघोली, करंबळी, वेसर्डे, कारिवडे, देवर्डे, कोंडुशी, म्हासरंग, पाळ्याचाहुडा, अंतीवडे, पाटगाव, हणमंते, तांब्याचीवाडी, डेळे, अंतुर्ली, तांबाळे, मानी, चिवाळे, शिवडाव, देवकेवाडी, कुडतरवाडी, देऊळवाडी, निष्णप, अनफ खुर्द, चांदमवाडी, पारदेवाडी, न्हाव्याचीवाडी, भालेकरवाडी, थड्याचीवाडी, सुक्याचीवाडी.