शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

‘चकोते ग्रुप’चे चकाचक अभियान

By admin | Updated: March 25, 2015 00:42 IST

अण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस : ३०० हून अधिक बसस्थानके झाली स्वच्छ

जयसिंगपूर : चकोते ग्रुप आॅफ इंडस्ट्रिज, गणेश बेकरी नांदणीचे अध्यक्ष अण्णासाहेब चकोते यांच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ या उपक्रमामध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून अभियान यशस्वी केले. मंगळवारी सकाळी ८ ते १० या वेळेत एकाच वेळी महाराष्ट्रासह सीमाभागातील ३०० बसस्थानकांची स्वच्छता करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी अण्णासाहेब चकोते यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. चकोते उद्योग समूहातील सर्व कर्मचारी, अधिकारी, वितरक, रिटेलर्स, मित्रपरिवार, तसेच बसस्थानकामधील अधिकारी, कर्मचारी, प्रवासीवर्ग, नागरिकही यामध्ये सहभागी झाले होते. गोळा झालेला कचरा वर्गीकरण करून नष्ट करण्यात आला. आवश्यक त्या ठिकाणी डंपर, ट्रॅक्टर याद्वारे कचरा डेपोमध्ये नेऊन टाकण्यात आला.कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल, मुरगूड, पेठवडगाव, मलकापूर, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, गारगोटी, राधानगरी या बसस्थानकांबरोबरच ग्रामीण भागातील बसस्थानकांची स्वच्छता करण्यात आली. सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, औरंगाबाद या जिल्ह्यांतील, तसेच कर्नाटक सीमाभागातील बेळगाव, विजापूर, बिदर, गुलबर्गा, बागलकोट या जिल्ह्यांतील ३०० पेक्षा जास्त बसस्थानकांची स्वच्छता केली. एकाचवेळी ३०० हून अधिक बसस्थानकांची स्वच्छता करण्यासाठी सुमारे १० ते १५ हजार लोकांचा सहभाग हा देशातील पहिलाच अभिनव सामाजिक उपक्रम ठरला आहे. सर्व ठिकाणी स्वच्छतेसाठी झाडू, बकेट, मास्क, टोपी, आदी साहित्य पुरविण्यात आले होते. याबरोबरच स्वयंस्फूर्तीने अनेक बसस्थानकांची रंगरंगोटी केली. अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणी, जेसीबी मशीन, ट्रॅक्टर, आदींचा वापर करण्यात आला.दरम्यान, कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात सुमारे २५० जणांनी स्वच्छता मोहीम राबविली. या उपक्रमाची सुरुवात चेअरमन अण्णासाहेब चकोते यांच्या हस्ते करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानकासह आगाराचीही स्वच्छता करण्यात आली. सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर हा परिसर चकाचक झाला. यावेळी चार ट्रॉली कचरा जमा झाला. गोळा झालेला कचरा योग्यरित्या वर्गीकरण करून ग्रुपच्यावतीने नष्ट केला. यामध्ये चकोते यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह चकोते उद्योग समूहातील सर्व कर्मचारी, अधिकारी, वितरक, रिटेलर्स, मित्रपरिवार, मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक बी. पी. नाईक, स्थानक प्रमुख अभय कदम, वाहतूक नियंत्रक दीपक घारगे, डी. आर. साळुंखे, विजय फाळके, रवींद्र कदम, संपत पाटील, प्रेमानंद पेडणेकर, मधुकर कदम, आदींनी सहभाग नोंदवला. चकोते यांची संकल्पपूर्तीपंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले आहे. याला बळकटी मिळवून देण्याचे कार्य अण्णासाहेब चकोते यांनी पूर्ण करून संकल्पपूर्ती केली. त्यांच्या या अभिनव उपक्रमाची महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांनी प्रेरणा घ्यावी व या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी होऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी एक पाऊल पुढे यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली गेली.स्वच्छता अभियानाचा देशातील पहिला सामाजिक अभिनव उपक्रम यशस्वी झाला आहे. या अभियानामध्ये सहभागी होऊन ते मोठ्या प्रमाणात यशस्वी केल्याबद्दल जनतेचे, सर्व बसस्थानकांतील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत, महानगरपालिका पदाधिकारी, नगरपालिका, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याबद्दल चकोते ग्रुप आभारी आहे.- अण्णासाहेब चकोतेअध्यक्ष, चकोते ग्रुप आॅफ इंडस्ट्रिज.