शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दख्खनचा राजा जोतिबाची आज चैत्र यात्रा, सासनकाठ्यांसह लाखो भाविक डोंगरावर दाखल

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 4, 2023 19:03 IST

खोबरं, गुलालाची उधळण आणि चांगभलंच्या गजराने आत्ताच जोतिबा डोंगर न्हाऊन निघाला

कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा आज, बुधवारी (दि.५) होत आहे. यानिमित्त गेल्या चार दिवसांपासून उंचच उंच सासनकाठ्या घेऊन लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत. खोबरं, गुलालाची उधळण आणि चांगभलंच्या गजराने आत्ताच जोतिबा डोंगर न्हाऊन निघाला आहे. आज दुपारी साडेबारा वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सासनकाठीची पूजा होईल. सायंकाळी पालखी सोहळा होईल.कोल्हापूरचा रक्षक देवता वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र जोतिबा म्हणजेे सर्वसामान्य लाखो भाविकांचे आराध्य दैवत. महाराष्ट्र, कर्नाटक आंध्रसह देवाची सर्वदूर ख्याती. अनेकांचे हे कुलदैवत. देवाची दरवर्षी चैत्रात सर्वात मोठी यात्रा भरते. तीन दिवसांच्या यात्रेतील मुख्य दिवस आज, बुधवारी आहे. पहाटे ३ वाजता घंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन हे विधी होतील.पहाटे ५ वाजता पन्हाळा प्रांत अमित माळी यांच्यासह देवस्थान समितीच्याक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाअभिषेक होईल. त्यानंतर देवाची राजदरबारी बैठी अलंकार महापूजा होईल. दुपारी १ वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचे पूजन होईल. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांच्यासह मानकरी उपस्थित असतील.यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू होईल. सायंकाळी साडेपाच वाजता तोफेच्या सलामीने देवाची पालखी यमाई मंदिराच्या दिशेने निघेल. सूर्यास्तानंतर यमाई (रेणुका) देवी व जमदग्नीचा विवाह सोहळा होईल. रात्री ८ वाजता देवाची पालखी पुन्हा जोतिबा मंदिरासाठी प्रस्थान करेल. रात्री १० वाजता पालखी सोहळा पूर्ण होईल.गेल्या चार दिवसांपासून डोंगरावर भाविक येत असून यात्रेआधीच डोंगर खोबरं व गुलालाने रंगला आहे. मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या आहेत. देवस्थान समिती, जिल्हा परिषद पोलिस प्रशासन व वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीच्यावतीने यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेवर सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच असणार आहे. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थांच्यावतीने अन्नछत्र, आरोग्य सेवेची यंत्रणा सज्ज आहे. एसटी महामंडळाच्यावतीने २४ तास बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा