शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:40 IST

परीक्षेतही तांत्रिक त्रुटीनेही झाला मनस्ताप : काही ठिकाणी पूर्ण प्रश्न स्क्रीनवर दिसत नव्हते

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर: राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेसंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे परीक्षा केंद्रे दूरच्या ठिकाणी मिळाल्याने विद्यार्थ्यांना प्रवासाचा मोठा त्रास सहन करावा लागत असताना, दुसरीकडे परीक्षा प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचा मनस्ताप आणखी वाढला आहे. सीईटीसाठी शनिवारी पहिल्या सत्रातील परीक्षा पार पडली. याशिवाय दुसऱ्या सत्रातील परीक्षा शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी होणार आहे, अनेक विद्यार्थ्यांना सांगली, सातारा, पुणे तसेच इतर दूरच्या ठिकाणी परीक्षा केंद्रे मिळाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहाटे लवकर निघावे लागणे, राहण्याची व्यवस्था करावी लागणे आणि अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

दरम्यान, काही परीक्षा केंद्रांवर गंभीर तांत्रिक अडचणींचाही सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. परीक्षेदरम्यान संगणकाच्या स्क्रीनवर प्रश्नपत्रिका व्यवस्थित दिसत नव्हती. १८ एप्रिल रोजी दुसऱ्या सत्रातील परीक्षा होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना सांगली, सातारा, पुणे तसेच इतर दूरच्या ठिकाणी परीक्षा केंद्रे मिळाल्याच्या तक्रारी आहेत. राहण्याची व्यवस्था करावी लागणे आणि अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. नव्हती, काही ठिकाणी पूर्ण प्रश्न स्क्रीनवर न दिसणे, तर काही ठिकाणी एकावेळी एकच प्रश्न दिसणे अशा अडचणी उ‌द्भवल्या. या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला आणि परीक्षेवर परिणाम झाल्याची भावना व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली असता, "आम्ही केवळ परीक्षा आयोजित करण्याचे काम करतो, तांत्रिक बाबी सीईटी विभागाच्या अखत्यारीत आहेत," असे उत्तर देण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

परीक्षा केंद्रांची संख्या वाढवा...

विद्यार्थी व पालकांनी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवावी, केंद्रे जवळच्या परिसरात द्यावीत, तसेच तांत्रिक सुविधा व मूलभूत सोयीसुविधा सुधाराव्यात, अशी मागणी केली आहे. संबंधित यंत्रणांनी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन सुधारणा कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिकच नाराजी निर्माण झाली आहे. याशिवाय, परीक्षा केंद्रांवर मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याच्या तक्रारी आहेत. हजारो रुपयांची परीक्षा फी आकारली जात असताना, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही योग्य सोय नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. महिनाभरापूर्वी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेबाबतही अशाच तक्रारी समोर आल्या होत्या. काही भागांत विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने पुरेसे संगणक उपलब्ध नव्हते, तर काही केंद्रांवर वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या. अशा परिस्थितीतही विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच पेपर सोडवावा लागल्याने मोठा अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : CET Exam Woes: Distant Centers, Technical Glitches Trouble Maharashtra Students

Web Summary : CET exam aspirants in Kolhapur face hardship due to distant test centers and technical issues. Students report computer glitches, impacting exam time. Demands rise for more centers and improved facilities to ease student burden.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र