शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

केंद्रीकरणाने डोकेदुखी

By admin | Updated: January 3, 2017 00:49 IST

बांधकाम परवाना : विभागीय कार्यालयाच्या अस्तित्वाला धक्का

कोल्हापूर : महानगरपालिकेशी संबंधित कामांना योग्य आणि तातडीने न्याय मिळावा, नागरिकांना नजीकच्या कार्यालयात जाऊन सहजपणे अधिकाऱ्यांना भेटता यावे, अशा विविध हेतूने विभागीय कार्यालयांना देण्यात आलेले बांधकाम परवानगीचे अधिकार आयुक्तांनी एका दणक्यात काढून घेतले असल्याने विभागीय कार्यालयाच्या अस्तित्वालाच धक्का बसला आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांचा हा निर्णय म्हणजे विकेंद्रीकरणाकडून केंद्रीकरणाकडे वाटचाल असल्याची टीका काही बांधकाम व्यावसायिकांनी केली असून, सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढणार आहे. महानगरपालिकेचा नगररचना विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनल्यामुळे तत्कालीन आयुक्त श्रीनिवास यांनी २००१ मध्ये नगररचना विभागाकडील अडीचशे चौरस मीटरच्या आतील बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, तसेच सुधारित बांधकाम परवानगीचे अधिकार काढून घेत विभागीय कार्यालयाकडे दिले. अधिकाराचे विकेंद्रीकरण करताना त्याची विविध कारणे त्यांनी स्पष्ट केली होती. त्याचा चांगला लाभ शहरवासीयांना झाला. त्या-त्या विभागीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांनाही अशी कामे झटपट करून देणे सोयीचे झाले होते; परंतु शनिवारी रात्री अचानक आयुक्त पी. शिवशंकर यांनी विभागीय कार्यालयाच्या उपनगर अभियंत्यांना असलेले हे अधिकार काढून घेत नगररचना विभागातील सहायक नगररचनाकार यांना देण्यात आले. आता एकच अधिकारी संपूर्ण शहरातील २५० चौरस मीटरच्या आतील बांधकामविषयक परवाने देणार आहे. त्यामुळे कामाचा बोजा वाढला जाण्याची शक्यता असून, त्यामुळे परवानगी लवकर मिळणे दुरापास्त होईल, असे जाणकारांना वाटते. आयुक्तांनी हा बदल करताना केंद्र सरकारच्या अमृत योजनेतील समावेशाचे कारण दिले आहे. (प्रतिनिधी) विभागीय कार्यालयांचं कसं होणार? १ राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विभागीय कार्यालयांची रचना करण्यात आली आहे. त्याचा हेतू चांगला आहे; परंतु आयुक्तांच्या निर्णयामुळे या कार्यालयातील बांधकाम विभागाच्या अस्तित्वालाच धक्का बसला आहे.२ बांधकामविषयक परवानगीचे अधिकार उपनगर अभियंत्यांना असल्यामुळे त्यांच्या हाताखालच्या कनिष्ट अभियंता, सहायक अभियंता यांच्यामार्फेत संबंधित जागेची पाहणी करणे, तातडीने परवानगीची फाईल पुढे देणे सोयीचे ठरत होते. कायदेतज्ज्ञांची लुडबूड आयुक्तांनी असा निर्णय घेण्यास प्रवृत्त करण्यात स्वत:ला कायदेतज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या एका अधिकाऱ्याचा हात असल्याची चर्चा महानगरपालिकेत सुरू झाली आहे. हा अधिकारी सहायक आयुक्त होण्याची स्वप्ने पाहत आहे. जबाबदारी नसताना नाक खुपसण्याच्या वृत्तीमुळे अन्य अधिकारी वैतागले आहेत. हा अधिकारी अन्य विभागांत सातत्याने लुडबूड करीत असल्याने सगळेच अधिकारी हतबल आहेत. आयुक्त पी. शिवशंकर यांनी सहायक संचालक नगररचना धनंजय खोत हा माणूस कामाचा नाही, त्यांना कोणतेही काम जमत नसल्याची तक्रार महासभेत केली होती; पण आता त्यांच्याच विभागावर नव्याने जबाबदारी सोपविली आहे. आयुक्तांच्या निर्णयाबद्दल अधिकारी अनभिज्ञ : विभागीय कार्यालयांना असलेले अधिकार बांधकामविषयक परवानगीचे अधिकार काढून घेऊन ते सहायक नगर रचनाकारांना देण्यात येत असल्याचा आदेश आयुक्तांनी शनिवारी रात्री साडेसात वाजता जाहीर केला. त्याबद्दल नगररचना विभाग किंवा बांधकाम विभागातील कोणाही अधिकाऱ्यांना त्याची माहिती नव्हती. एखादा निर्णय घेत असताना संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाते, परंतु अशी कोणतीही चर्चा आयुक्तांनी कोणत्याही अधिकाऱ्यांशी केली नसल्याचे स्पष्ट झाले. या निर्णयामुळे सर्वच अधिकारी अचंबित झाले.