शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महापूराने झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 17:58 IST

आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील गावांना महापूराचा जबरदस्त फटका बसला. यामुळे परिसरातील शेती, घरे, लघुद्योग, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज दिवसभरात अनेक ठिकाणांची पाहणी केली.

ठळक मुद्देमहापूराने झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणीग्रामस्थांशी संवाद साधला

कोल्हापूर : आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील गावांना महापूराचा जबरदस्त फटका बसला. यामुळे परिसरातील शेती, घरे, लघुद्योग, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज दिवसभरात अनेक ठिकाणांची पाहणी केली.महापूराने झालेल्या नुकसानीचा या केंद्रीय पथकाने गेल्या दोन दिवसात सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आढावा घेतला. दोन वेगवेगळ्या केंद्रीय पथकांनी आज आंबेवाडी, चिखली गावांसह अर्जुनवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, भैरेवाडी, इचलकरंजी, केर्ली, वाडी रत्नागिरी, राजाराम बंधारा, वडगणे, तसेच कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर, गवत मंडई, कुंभार गल्ली तसेच शिवाजी पूल परिसराला भेट देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला.पॉलिसी अ‍ॅन्ड प्लॅनिंग, नवी दिल्लीचे सहसचिव डॉ. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील या केंद्रीय पथकामध्ये नवी मुंबईचे अधिक्षक अभियंता संजय जयस्वाल होते. या केंद्रीय पथकात आर. पी. सिंग संचालक, कृषी मंत्रालय, नवी दिल्ली व व्ही. पी. राजवेदी, अवर सचिव, ग्रामविकास विभाग, नवी दिल्ली या सदस्यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत  विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, करवीरचे प्रांत सचिन इथापे, करवीरचे तहसीलदार सचिन गिरी, अप्पर पोलिस अधिक्षक तिरुपती काकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.डॉ. व्ही. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने अर्जुनवाड येथील वाहून गेलेली शेतजमीन, पिकांचे झालेले नुकसान, महावितरणचे झालेले नुकसान, प्राथमिक आरोग्य उप केंद्र, दलित वस्तीतील पडलेली घरे यांची पाहणी केली. यानंतर शिरोळ, नृसिंहवाडी, भैरेवाडी येथील यंत्रमागाचे नुकसान, सोयाबीन, ऊस पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी केर्ली-वाडी रत्नागिरी खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. तसेच शिवाजी पूलाच्या परिसराचीही पाहणी केली.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर