शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा; 'हे' लाभ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 12:25 IST

प्रत्येक महिन्याला चार हजार रूपये देण्यात येणार असून पहिली ते १२ वीपर्यंत २० हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

कोल्हापूर : कोरोना महामारीत अनेक बालकांना आपल्या आई-वडिलांना गमवावे लागले आहे. अशा अनाथ मुलांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली.जिल्ह्यातील १४ बालके आई-वडिलांविना पोरकी झाली आहेत. पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत मुलांना देण्यात येणारे लाभ, सेवा, अनाथ झालेल्या बालकांशी पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सहायक लेखाधिकारी के. बी. खरमाटे, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले, सदस्य ॲड. दिलशाद मुजावर, ॲड. संजय मुंगळे, बाल न्याय मंडळाचे ॲड. एस. पी. कुरणे, ॲङ रेवती देवाळपूरकर यांच्यासह बालके, त्यांचा सांभाळ करणारे पालक उपस्थित होते.यावेळी १८ वर्षांवरील ओम गुरुनाथ हासुरे-पाटील, विनायक विष्णू यादव, राजवर्धन श्रीकांत दिवसे, किरण सुरेश खवरे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पीएम केअर कीट (स्नेह प्रमाणपत्र, विमाकार्ड, पासबुक) देण्यात आले.पंतप्रधान मोदी म्हणाले, मुलांनो तुमच्या आई-वडिलांचा मृत्यू भरून निघणार नाही पण देशातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत असेल. मनोरंजन, खेळाबरोबर मार्गदर्शक ठरणारी चांगली पुस्तके वाचा. खेलो इंडियामध्ये सहभागी व्हा, योगामध्ये सामील व्हा. स्वत:वर विश्वास ठेवा, हार मानू नका. पीएम केअरमधून मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी किंवा खासगी शाळेत प्रवेश, पुस्तके, कपड्यांचा खर्च केंद्र सरकार करेल. व्यावसायिक शिक्षणासाठीही मदत करण्यात येईल.

हे लाभ मिळतील...

अनाथ मुलांची काळजी, संरक्षण, शिक्षणाद्वारे सक्षमीकरण करणे आणि १८ ते २३ वर्षांदरम्यान विद्यावेतन देण्यात येणार आहे. २३ व्या वर्षी एकरकमी १० लाख रूपये केंद्र सरकारचे आणि पाच लाख रुपये राज्य सरकारचे दिले जातील. प्रत्येक महिन्याला चार हजार रूपये देण्यात येणार असून पहिली ते १२ वीपर्यंत २० हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तांत्रिक शिक्षणासाठी ५० हजार रुपये शिष्यवृत्ती असून प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून दरवर्षी आरोग्य विमा असेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी