गडहिंग्लज शहरात एकूण आठ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यांतील अनुदानित तुकडीतील प्रवेश क्षमता ५२०, तर विनाअनुदानित तुकडीतील प्रवेश क्षमता १०६० मिळून १५८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक असे :
- २५ ते ३० ऑगस्ट : ऑनलाईन अर्ज भरणे.
- ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर : अर्जांची छाननी.
- ३ ते ६ सप्टेंबर : निवड यादी तयार करणे.
- ७ सप्टेंबर : निवड यादी प्रसिद्ध करणे.
- ७ ते ८ सप्टेंबर : तक्रारींचे निराकरण (स्थळ : जागृती प्रशाला)
- ९ ते १५ सप्टेंबर : प्रवेश निश्चित करणे.
कोल्हापूर शहरानंतर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविणारे गडहिंग्लज हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले व एकमेव शहर आहे. गेल्या चार वर्षांपासून ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.