शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

ऊसदरासाठी केंद्राकडे पॅकेज मागणार : चंद्रकांतदादा

By admin | Updated: November 4, 2014 00:48 IST

सरकारचा ‘एमडी’--बफर स्टॉक करून त्यावर ही रक्कम देता येईल का, असाही विचार

कोल्हापूर : बाजारात साखरेचा दर २६०० पर्यंत असताना उसाला तेवढीच पहिली उचल देणे शक्य नाही. यासाठी गतवर्षीप्रमाणेच केंद्र सरकारने परतफेड करण्याच्या अटीवर कारखान्यांना पॅकेज द्यावे यासाठी लवकरच प्रयत्न करणार असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे ‘लोकमत’शी बोलताना दिली. राज्यात व केंद्रातही भाजपचेच सरकार असल्याने अशी मदत मिळवणे सहज शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पहिल्या उचलीची मागणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची एफआरपी २२०० पासून २६०० पर्यंत आहे. शेतकऱ्याला एकरकमी एफआरपी मिळाली तरी त्याची अडचण नाही. परंतु खुल्या बाजारातील साखरेचे दर कमी असल्याने कारखान्यांना ही रक्कम देण्यात अडचणी आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी उद्याच मुंबईला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यासंबंधी बोलून पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यासाठी आठवड्याभरचा अवधी लागेल परंतु महाराष्ट्रातील साखर कारखानदारीसाठी शे-चारशे कोटींची मदत मिळवणे हे सहज शक्य आहे. केंद्र सरकारचा विचार करता त्यांनाही ही फार मोठी रक्कम नाही. शिल्लक साखरेचा बफर स्टॉक करून त्यावर ही रक्कम देता येईल का, असाही विचार आम्ही करत आहोत. (प्रतिनिधी)सरकारचा ‘एमडी’राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना कार्यकारी संचालक नेमण्याचा अधिकार आहे. ते आपले ऐकेल असाच कार्यकारी संचालक नेमतात. त्यामुळे या कारखानदारीचे नुकसान झाले आहे. त्यात बदल करून खरेतर आयएएस केडरचा अधिकारीच कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त व्हायला हवा परंतु एवढ्या मोठ्या संख्येने हे अधिकारी उपलब्ध होणार नसल्याने त्या दर्जाचा अधिकारी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त केला जाईल, असे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांंनी स्पष्ट केले.