शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अपघाताचे केंद्रबिंदू ‘कमतनूर गेट’

By admin | Updated: August 27, 2015 23:53 IST

संकेश्वरातील वाहतूक समस्या : दिशादर्शक फलक मोडकळीस आल्याने त्याची दिशा बदलली

विलास घोरपडे - संकेश्वर भागातील कमतनूर गेट मार्गावर यरगट्टी व जेवरगी हे कर्नाटकचे दोन राज्यमार्ग, तर महाराष्ट्रातील सांगली बाजारपेठेमुळे रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. यामुळे लहान-मोठे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. परिणामी ‘कमतनूर गेट’ म्हणजे डेंजर झोन अशी स्थिती बनली आहे.संकेश्वर शहरापासून २ कि.मी. अंतरावरील कमतनूर गेट अर्थात ‘सर्कल’नजीक हॉटेल, ढाबा, वाईन्स शॉपच्या विळख्याने लोकांची वर्दळ असते. ग्रामीण भागातील नागरिकांचा संकेश्वर बाजारपेठेशी संपर्कासाठी जीप, टमटम, मॅक्सीकॅब आदी ‘वडाप’ यांचा वावर असतो. सोबत निडसोशी पॉलिटेक्निकमध्ये शालेय विद्यार्थी दुचाकीवरून वेगाने जात असतात. तथापि, सर्कलनजीक अरद रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडेझुडपे, दिशादर्शक फलकाच्या अभावामुळे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. परिसरात कपराळ ओढ्याच्या वळणावर समोरील वाहनाचा अंदाज येत नसल्याने नवख्या चालकांना रहदारीमुळे ब्रेक लावताना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.ऊस गळीत हंगामात हिरा शुगर (संकेश्वर), सतीश शुगर्स (हुणचाळ), ओम शुगर (जैनापूर)ची वाहतूक या मार्गावरूनच होते. सोबत परप्रांतातील सद्भक्त सौंदत्ती यल्लम्मा देवदर्शनास व गोकाक फॉल्स् येथे पर्यटनास जातात; पण सर्कलवर दिशादर्शक फलक मोडकळीस आल्याने त्याची दिशा बदलली आहे. यामुळे प्रवासी गोंधळून जातात.कर्नाटकातील १२ क्रमांकाच्या संकेश्वर-विजापूर-जेवरगी या राज्यमार्गावर वाहनांची वर्दळ नेहमीच असल्याने या राज्यमार्गास राष्ट्रीय मार्ग क्रमांक ४ मध्ये रूपांतर करून संकेश्वर-विजापूर रस्ता रुंदीकरण करावा, अशी मागणी गत दोन महिन्यांपूर्वी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.उपाययोजना गरजेच्यासंकेश्वर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जानेवारी २०१५ ते जुलै २०१५ या सात महिन्यांच्या काळात २१ विविध ठिकाणच्या अपघातांत नऊ ठार, तर २१ जखमी झाले. त्यात काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. याठिकाणी घडणाऱ्या अपघाताला पायबंद घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व कर्नाटक राज्य रस्ते विकास महामंडळाने संयुक्तपणे सर्कलनजीक असणारी दुकाने हटवून, रस्ता रुंदीकरण, मार्गावरील झुडपे हटविणे, चारही मार्गांवर दिशादर्शक फलक लावून दुभाजक बनविणे गरजेचे ठरणार आहे.