कोल्हापूर : करवीर संस्थानचे भूतपूर्व छत्रपती शहाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने रविवारी नवीन राजवाडा येथील छत्रपती शहाजी यांच्या पुतळ्यास श्री शाहू छत्रपती व प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, नगरसेवक राजाराम गायकवाड, माजी उपमहापौर संजय मोहिते, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, प्रनील इंगळे, ॲड. राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते, न्यू पॅलेस सोसायटीचे पदाधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो क्रमांक - ०४०४२०२१-कोल-छत्रपती शहाजी
ओळ -
कोल्हापूर संस्थानचे भूतपूर्व छत्रपती शहाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या न्यू पॅलेस येथील पुतळ्यास शाहू छत्रपती व महानगरपालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रनील इंगळे, ॲड. राजेंद्र चव्हाण, मालोजीराजे, संजय मोहिते, प्रसन्न मोहिते उपस्थित होते.