शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

दुचाकीचा असाही ५० वा वाढदिवस साजरा, गावातून मारला फेरफटका-कापला केक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 20:38 IST

बँकेतून कर्ज काढून ही बुलेट घेतली -आणि ही बुलेट त्यांना लकी लागली . त्यावेळी त्यांची शिरोली दुमाला गावचे उपसरपंचपदी निवड झाली . रयत संघ,इफको खत संघ कुंभी कासारी साखर कारखाना आदि क्षेत्रात यश मिळविले . घरची लक्ष्मी म्हणून बुलेट गाडी गेली ५० वर्ष जपून वापर करीत होते .

ठळक मुद्देजेष्ठ सहकार व कॉग्रेस नेते विश्वासराव पाटील यांनी रविवारी रात्री शिरोली दुमाला ( ता. करवीर ) गावात भव्य रॉलीद्वारे थाटामाटात साजरा केला .

सावरवाडी : इंटरनेट, व्हॉट्सअप युगात सध्या कोण कशाचा वाढदिवस साजरा करेल यांचा नेम नाही . गेली पाच दशके कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकिय सहकार क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या गोकूळ दुध संघाचे जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी आपल्या स्वतःच्या बुलेट गाडी चा ५०वा वाढदिवस रविवारी रात्री शिरोली दुमाला ( ता. करवीर ) गावात भव्य रॉलीद्वारे थाटामाटात साजरा केला .        विश्वासराव पाटील यांनी वयाच्या १९ व्या वर्षी  दि . १० नोंव्हेंबर १९६९ साली एम एच के ६९२२ नंबरची साडेचार हजार रूपयेला खरेदी केली . त्यावेळी तात्कालीन सिंडीकेट बँकेतून कर्ज काढून ही बुलेट घेतली -आणि ही बुलेट त्यांना लकी लागली . त्यावेळी त्यांची शिरोली दुमाला गावचे उपसरपंचपदी निवड झाली . बुलेट गाडी खानदानाचा मान असतो  त्यावेळी पेट्रोल दर एक रूपये २५ पैसे होता . त्यांनंतर त्यांनी करवीर पंचायत समितीच्या राजकारणात प्रवेश केला . पुढे माजी कृषिमंत्री कै श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या माध्यमातून कॉग्रेस पक्ष संघटनेत प्रवेश केला .गोकूळ दुध संघाच्या राजकारणात प्रवेश केला . रयत संघ,इफको खत संघ कुंभी कासारी साखर कारखाना आदि क्षेत्रात यश मिळविले . घरची लक्ष्मी म्हणून बुलेट गाडी गेली ५० वर्ष जपून वापर करीत होते . विश्वासराव पाटील यांचे भाऊ तुकाराम पाटील मुलगा सचिन, पुतणे सुनिल, राहूल, यांनी ही बुलेट चालविली . पाटील घराण्याची शान म्हणून तीची देखभाल ही वेळ वर केली .        या बुलेट गाडीला ५० वर्ष पूर्ण झाल्याने भागातील ५० बुलेट मालकांच्या ताफ्यासहीत बीडशेड ते शिरोली दुमाला गावापर्यत भव्य रॉली काढण्यात आली . संध्याकाळी सात वाजता पाटील परिवारातर्फ या बुलेटचे पुजन करण्यात आले नंतर सर्व नातवंड यांच्या हस्ते केक कापून भव्य आतषबाजी करून बुलेटगाडी चा ५०वा वाढदिवस हजारो कार्यकरत्याच्या साक्षीने साजरा करण्यात आला . यावेळी ५० बुलेट गाडीमालकांचा कोल्हापुर फेटा बांधून गौरव करण्यात आला .             यावेळी जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपसभापती शामराव सुर्यवंशी तुकाराम पाटील, माजी सरपंच नंदकुमार पाटील, एस के पाटील अनिल सोलापुरे, सचिन पाटील, अशोक पाटील, संजय पाटील, प्रदीप पाटील, राहुल पाटील, माधव पाटील, सरपंच रेखा कांबळे, उपसरपंच सरदार पाटील, विलास पाटील संग्राम जाधव, हभप शहाजी खोत, यांच्यासह हजारो कार्यकर्त उपस्थितीत होते . 

 

 बुलेट गाडी खरेदी करून ५० वर्ष पूर्ण झाले !पाटील घराण्यात बुलेट गाडी घेऊन ५० वर्षाचा कालखंड झाल्याने कुंटूबांनी बुलेट गाडी चा५०वा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले . घरची लक्ष्मी म्हणून आमची तिसरी पिढी ही बुलेट गाडी चालवितात . आणि बुलेटचा वाढदिवस भाटामाटात आम्ही साजरा केला . --- विश्वासराव पाटील, जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष गोकूळ दुध संघ, 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर