शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

जिल्हा परिषदेत पुन्हा ‘सीसीटीव्ही’ची नजर

By admin | Updated: August 1, 2015 00:08 IST

दुरुस्ती युद्धपातळीवर : कार्यालयात, आवारात नव्याने बसविणार कॅमेरे, चार वर्षांपूर्वीची यंत्रणा

कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयात चार वर्षांपूर्वी बसविलेला; परंतु नादुरुस्त झालेला सीसीटीव्ही कॅमेरा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. कार्यालयात आवश्यक त्या ठिकाणी विविध विभागांत व आवारात कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या रूपाने तिसऱ्या डोळ्याची आता ‘नजर’ राहणार आहे. जिल्हा परिषद कार्यालयाची ओळख ‘मिनी मंत्रालय’ अशी आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जातात. परिषदेतील विविध कार्यालयांशी रोज शेकडो लोकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंध येत असतो. परिषदेत आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, पशुसंवर्धन, शेती, बांधकाम, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण असे महत्त्वाचे १५ विभाग आहेत. याशिवाय १२ तालुक्यांतील पंचायत समित्यांचा कारभार परिषदेच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे. दोन महिन्यांपूर्वी कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा चांगला गाजला. त्यानंतर सर्वच विभागांत बायोमेट्रिक हजेरी यंत्रे बसविली. प्रशासनात तंत्रज्ञानाचा उपयोग करून पारदर्शक व गतिमान कारभार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कामकाजावर आॅनलाईन नजर राहावी, यासाठी २०१० साली इमारतीमधील चारही मजल्यांवरील कक्षाबाहेर मोकळ्या जागेत ४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. दरम्यान, वेळेवर देखभाल व दुरुस्ती न केल्याने यातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. कॅमेरे बंद असल्याने ‘आओ-जाओ, घर तुम्हारा’ अशी अवस्था झाली होती. कामचुकार अधिकारी, कर्मचारी मोकाट बनले होते. कधीही या, कधीही जा; चहासाठी तासन्तास बाहेर जा, असे सुरू होते. त्याचा परिणाम कामानिमित्त आलेल्यांना ‘साहेब बाहेर गेलेत’ असे उत्तर ऐकून परतावे लागत होते. हे चित्र बदलण्यासाठी सर्वच विभाग आणि अधिकारी यांच्या कक्षांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी पदाधिकारी यांची मागणी होती. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. अधिकाऱ्यांच्या कक्षात पहिल्यांदा कॅमेरा लावा आणि नंतर बाहेर लावा, अशीही मागणी होती. मात्र, काही कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कॅमेरा बसविण्याला छुपा विरोध आहे. गेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सीसीटीव्ही बसविण्याचा विषय चर्चेला आला. त्यानुसार आठ दिवसांपासून नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. कार्यालयात आणि बाहेर नव्याने किती सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागणार, त्याचा सर्व्हे बांधकाम विभागाने करून सामान्य प्रशासन विभागाकडे द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर नव्याने किती ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, हे स्पष्ट होणार आहे. आरोग्य विभागाचा कॅमेरा सुरूजिल्हा परिषदेच्या कार्यालयात एकमेव आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कक्षात आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. आरोग्याधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली काम करण्यासाठी नेहमी आग्रही राहिले. त्यामुळे तेथील कॅमेरेही अखंडपणे सुरू आहेत.सन २०१० मध्ये बसविण्यात आलेले; मात्र नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. कार्यालयात नव्याने कोठे-कोठे कॅमेरे बसविणे आवश्यक आहे, त्याचा सर्व्हे करण्यास बांधकाम विभागास सांगितले आहे.- चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)