शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान; हनीट्रॅपच्या प्रकारात होतीय वाढ, कोल्हापुरात अल्पवयीन मुलीने व्यापाऱ्याला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 18:26 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या साखर व्यापाऱ्यास हनी ट्रॅपमध्ये अडकून त्यांच्याकडून सव्वातीन कोटींची खंडणी उकळल्याचा प्रकार ताजा असतानाच आज आणखीन एक ...

कोल्हापूर : कोल्हापूरच्या साखर व्यापाऱ्यास हनी ट्रॅपमध्ये अडकून त्यांच्याकडून सव्वातीन कोटींची खंडणी उकळल्याचा प्रकार ताजा असतानाच आज आणखीन एक अशीच घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने कोल्हापुरातील तरुण कापड व्यापाऱ्याला अडकवून सुमारे अडीच लाखाला गंडा घातला आहे. आज, रविवारी (दि.२१) हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सागर पांडुरंग माने (वय-३२ रा. कळंबा. ता. करवीर), सोहेल ऊर्फ अरबाज मुनाफ वाटंगी (२३, रा. जुना वाशी नाका), उमेश श्रीमंत साळुंखे (२३, रा. राजारामपुरी), आकाश मारुती माळी (३०, रा. यादवनगर), लुकमान शकील सोलापूरे (२७, जवाहरनगर) आणि सौरभ गणेश चांदणे (२३, यादवनगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत.

या युवतीने संबंधित व्यापाऱ्यास त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरुन संबंधित व्यापाऱ्याने दोन दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र नातेवाईक आणि पोलिसांच्या सर्तकेतेमुळे तरूणाचा जीव वाचला आहे.याप्रकरणी पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती परिसरातील एका १७ वर्षीय अल्पवयीन युवतीसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी राजवाडा पोलिस ठाण्यात अल्पवयीन तरुणीसह साखळीतील संशयित विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.हनीट्रॅपचा हा प्रकार उघडकीस येताच शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. फिर्यादी असलेल्या तरुणाची अल्पवयीन युवतीबरोबर काही काळापूर्वी ओळख झाली. यातूनच हा प्रकार घडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीhoneytrapहनीट्रॅप