शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान : फसवणुकीचा नवा फंडा; ३६ महिन्यांत दामदुप्पट..काय आहे नेमकी स्कीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 13:30 IST

तुम्ही फक्त एक लाख रुपये भरले की ४५ दिवसांनंतर तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये व्याज मिळणार आणि ३६ महिने झाल्यावर मूळ मुद्दल एक लाख रुपये परत मिळणार अशी ३६ महिन्यांत रक्कम दामदुप्पट योजनेने कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत धुमाकूळ घातला आहे.

विश्वास पाटील -कोल्हापूर : तुम्ही फक्त एक लाख रुपये भरले की ४५ दिवसांनंतर तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये व्याज मिळणार आणि ३६ महिने झाल्यावर मूळ मुद्दल एक लाख रुपये परत मिळणार अशी ३६ महिन्यांत रक्कम दामदुप्पट योजनेने कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत धुमाकूळ घातला आहे. या तिन्ही जिल्ह्यांत मिळून किमान एक हजार कोटींहून जास्त रक्कम या योजनेत गुंतवणूक झाल्याची माहिती आहे. ही गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये असल्याचे सांगण्यात येत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लजमधील मुख्यत: शिक्षक, करवीर तालुक्यातील सांगरूळपासून बीडशेडपर्यंतची गावे, पन्हाळा तालुका व शेजारच्या सांगली व सातारा जिल्ह्यांत कामधंदा सोडून लोक याच गुंतवणुकीसाठी जिवाचा आटापिटा करू लागले आहेत. एखाद्या छोट्या गावांतूनही दीड-दीड कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक या योजनेत झाली आहे. मुख्यत: शिक्षक, व्यावसायिक, चांगली आर्थिक क्षमता असलेले शेतकरी यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू लागले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात किमान चार कंपन्यांच्या माध्यमातून हा व्यवहार सुरू आहे. आज या गावात त्याला गाडी मिळाली, उद्या त्या गावात मिळाली अशी हवा सगळीकडे होत असल्याने लोक मोठ्या प्रमाणावर कर्जे काढूनही त्यामध्ये गुंतवणूक करू लागले आहेत.

आतापर्यंतचा अनुभव..कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत संचयनी, पिअरलेस, कल्पवृक्ष, पॅनक्लब यासारख्या अनेक कंपन्यांमध्ये लोकांनी शेकडो कोटींची गुंतवणूक केली व ती सर्व बुडली आहे. मेकर ग्रुपमध्येही कोल्हापूर जिल्ह्यातील ५० कोटींची व पश्चिम महाराष्ट्रात ५० कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्याविरुद्ध उच्च न्यायालयात तीन वर्षे दावा सुरू आहे. परंतु, मूळ संशयित आरोपीच अजून सापडत नाही. असे अनुभव पाठीशी असतानाही लोक आमिषाला भुलून गुंतवणूक करत आहेत.एखादी व्यक्ती शेअर ब्रोकिंगचा परवाना घेऊन व्यक्तिगत शेअर मार्केटिंग करू शकतो. परंतु, या व्यवहारात परवाना व्यक्तिगत, लोकांकडून पैसे घेऊन ते स्वत:च्या नावांवर ट्रेडिंग केले आहे. म्युच्युयल फंडात लोकांकडून पैसे घेऊन गुंतवणूक करण्यास सेबी मुभा देते, परंतु ही गुंतवणूकदाराने स्वत:च्या जोखमीवर करावी, असे अपेक्षित असते.

योजना नक्की काय आहे..- एक लाख रुपये भरले की, ४५ दिवसांनी दरमहा ३ हजार रुपये व्याज सुरू.- दरमहा व्याज ३६ महिने मिळणार- मूळ मुद्दल १ लाख रुपये पुन्हा ३६ महिन्यांनंतर परत.- कंपनीसाठी ब्रोकर म्हणून मी १५ लाख गुंतवणूक मिळवून दिल्यास ६ लाखांपर्यंतची गाडी लगेच मिळणार. गाडी आपल्या नावावर घ्यायची, परंतु त्याचे व्याज व कर्जाचे हप्ते संबंधित कंपनी देणार.वस्तुस्थिती काय सांगते..

जगात आज अशी एकही बँक किंवा वित्तीय संस्था नाही, की ती ३६ महिन्यांत दामदुप्पट रक्कम देऊ शकेल. आम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला त्याचा फायदा मिळवून देतो, असे सांगण्यात येते. परंतु, शेअर मार्केटमध्ये मागच्या ४० वर्षांत कधीच जास्तीत जास्त १६.५० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळालेला नाही. तो परतावाही किमान ५ ते १० वर्षे गुंतवणूक केल्यावरच मिळू शकतो, असे आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.मग पैसे परत कसे दिले जातात..?तज्ज्ञांच्या मते हा सरळ सरळ मल्टिलेव्हल मार्केंटिंगचा फंडा आहे. ज्यामध्ये पुढच्याकडून आलेले पैसे मागच्याला दिले जातात. जास्त परतावा मिळतो म्हणून लोक मोठ्या संख्येने त्यामध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. जेव्हा नव्याने गुंतवणूक करणारे लोक थांबतील, तेव्हा हा सगळा फुगा फुटेल. परंतु, सध्या लोकांना पैसे मिळतात म्हणून त्यात गुंतवणूक होत आहे.गडहिंग्लजचा अनुभव ताजा..गडहिंग्लजमधील एका सहकारी बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने बँकेतील पैसे असेच शेअर मार्केटमध्ये गुंतवून तब्बल १३ कोटी रुपयांस गंडा घातला आहे. तरीही गडहिंग्लजचे लोक अजूनही त्यातून काही शहाणपण घ्यायला तयार नाहीत.गाडीचे गोडबंगाल..१५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास कंपनीकडून तुम्हाला सहा लाखांची गाडी दिली जाते. गाडी तुमच्या नावावर असते. कंपनी फक्त व्याज व हप्ते देते. याचा अर्थच असा आहे की जेव्हा केव्हा या गुंतवणुकीचा फुगा फुटेल तेव्हा कंपनी नामानिराळी राहील व कर्ज देणारी बँक गाडी ओढून नेईल.

सेबीच्या नियमानुसार कोणीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून फिक्स्ड रिटर्नची हमी देऊ शकत नाही. या नियमाला पळवाट म्हणून सेबीकडून शेअर ब्रोकरचा परवाना घेऊन दिशाभूल करून विविध नावीन्यपूर्ण नावानी पैसे घेतले जातात. योग्य कायदेशीर माहिती न घेता गुंतवणूक केल्यास मोठी फसवणूक होऊ शकते. - दीपक गुंदेशा, सीए कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshare marketशेअर बाजारfraudधोकेबाजी