आजरा :
आजरा तालुक्यातील बेलेवाडी हु. ते धामणे रस्त्यावर बिगरपासी लाकडाची वाहतूक करताना आयशर टेम्पो आढळला. वनविभागाने टेम्पोमधील २१ घनमीटर जळाऊ लाकूड अंदाजे १३ हजार २७६ रुपयांचे व २ लाख ६५ हजारांचा आयशर टेम्पो जप्त केला आहे. टेम्पोचालक अशोक संजय लोहार (रा. हासूर बु., ता. कागल) याला ताब्यात घेतले आहे.
बुधवारी रात्री ११च्या सुमारास खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आजरा वनक्षेत्रपाल समरजित पवार, गारगोटी वनक्षेत्रपाल किशोर आहेर यांच्यासह पथकाने बेलेवाडी हु. ते धमाणे रस्त्यावर बिगरपासी लाकूड घेऊन जाणारा टेम्पो पकडला. या कार्यवाहीमध्ये वनरक्षक नागेश खोराटे, किरण पाटील, वनसेवक संभाजी पोवार, शिवाजी मटकर यांनी सहभाग घेतला.
कोल्हापूर उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अमरजित पवार अधिक तपास करीत आहेत.
---------------------
फोटो ओळी : बिगरपासी लाकूड वाहतूक करणारा टेम्पो व आरोपी अशोक लोहार यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी.
क्रमांक : २५०३२०२१-गड-०८