शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यातील अधिकाऱ्यावरच जातपंचायतीचा बहिष्कार, पुरोगामी विचार असलेल्या कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 19:41 IST

समाजातील काही कुटुंबांवर गेली २८ वर्षे जातपंचायतीने बहिष्कार टाकला आहे. गुंडगिरी व सामाजिक पिळवणूक होत असलेल्या कुटुंबातील व्यक्ती भीतीपोटी बोलत नसून अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी पीडितांनी लेखी केली आहे.

रुकडी माणगाव : शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथेला बंदी घालण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्याचा राज्यात डंका वाचला. राज्यशासनाने याची दखल घेत सर्वच ग्रामपंचायतीने हा ठराव मांडावा आणि ही प्रथा बंद करावी असा आदेशच काढला. पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या याच कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे रुढी परंपराना छेद दिला जात असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सैन्य दलातील अधिकाऱ्याच्या घरावरच बहिष्कार टाकून त्याना समाजातून बहिष्कृत केल्याची घटनी समोर आल्याने खळबळ उडाली आहे.खासदारांचेच गाव असलेल्या रुकडी गावात हा प्रकार घडला आहे. येथील धनगर समाजातील सैन्यदलातील अधिकारी देवेंद्र शिणगारे यांच्यावर जातपंचायतीने बहिष्कार टाकून समाजातून बहिष्कृत केले आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे कैफियत मांडूनही न्याय मिळत नसल्याचे पीडित कुटुंबियांनी 'लोकमत'ला सांगितले...म्हणून शिणगारे कुटुंबियांवरही बहिष्काररुकडी येथील जातपंचायतीने समाजातील काही कुटुंबांवर बहिष्कार टाकला होता. बहिष्कार टाकलेल्या कुटुंबाबरोबर सैन्यदलातील अधिकारी देवेंद्र शिणगारे  संबंध ठेवतात व त्यांच्याबरोबर रोजीरोटीचा व्यवहार करतात, म्हणून गेली तीन वर्षे याही कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला. तर या पीडित कुटुंबांवर मनमानीप्रमाणे निर्बंध लादणे, दंड, शिवीगाळ, मारहाण करणे अशी कृत्ये करत, समाजात दहशत निर्माण केली जात आहे.गेली २८ वर्षे जातपंचायतीचा बहिष्कारतक्रारीमध्ये तक्रारदाराने मंदिरामध्ये प्रवेश केल्यास जिवे मारण्याची धमकी देणे, देवाची पूजा करू न देणे, तक्रारदार कुटुंबाबरोबर कोणी संपर्क केल्यास पीडित कुटुंबांना धमकावले जात. समाजातील काही कुटुंबांवर गेली २८ वर्षे जातपंचायतीने बहिष्कार टाकला आहे. गुंडगिरी व सामाजिक पिळवणूक होत असलेल्या कुटुंबातील व्यक्ती भीतीपोटी बोलत नसून अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी पीडितांनी लेखी केली आहे.राजकीय पाठबळया प्रकाराला राजकीय पाठबळ मिळत आहे. त्यापेक्षा दुर्दैव म्हणजे हातकणंगले पोलीस स्टेशनकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करून पुरोगामी जिल्ह्यात अशी घटना काळिमा फासणारी असल्याचे मत सैन्याधिकारी देवेंद्र शिणगारे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर