शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

निवृत्त लिपिकाची रोकडसह बॅग लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 10:57 IST

पीरवाडी (ता. करवीर) येथील संकल्पसिद्धी मंगल कार्यालयात नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेल्या सेवानिवृत्त लिपिकाची बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. बॅगेमध्ये ३0 हजार रुपये, दोन सोन्याच्या अंगठ्या, बँकेची कागदपत्रके असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल होता. ही घटना शनिवारी (दि. २३) रोजी घडली. ​​​​​​​

ठळक मुद्देनिवृत्त लिपिकाची रोकडसह बॅग लंपासपीरवाडी येथील संकल्पसिद्धी मंगल कार्यालयातील घटना

कोल्हापूर : पीरवाडी (ता. करवीर) येथील संकल्पसिद्धी मंगल कार्यालयात नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेल्या सेवानिवृत्त लिपिकाची बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. बॅगेमध्ये ३0 हजार रुपये, दोन सोन्याच्या अंगठ्या, बँकेची कागदपत्रके असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल होता. ही घटना शनिवारी (दि. २३) रोजी घडली.अधिक माहिती अशी, मधुकर मारुती वाघमारे (वय ६६, रा. खंडोबा मंदिराजवळ, लक्ष्मीनगर, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) हे सहा वर्षांपूर्वी पुणे येथील शासनाच्या संरक्षण खात्यातून लिपिक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या नातेवाईकाचे लग्न पीरवाडी येथील हॉलमध्ये असल्याने ते पत्नी, दोन मुलांसोबत शनिवारी कोल्हापुरात आले होते.

लग्न समारंभ आटोपल्यानंतर ते जेवण विभागात गेले. ते जेवण करून हात धुण्यासाठी गेले. जाताना त्यांनी सोबतची बॅग खूर्चीवर ठेवली होती. परत येऊन पाहतात तर बॅग गायब होती. आजूबाजूला शोध घेतला; परंतु ती सापडली नाही.

याप्रकरणी त्यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली. या सभागृहामध्ये सीसीटीव्ही नसल्याने लग्न समारंभात अनेकवेळा चोऱ्या घडल्या आहेत. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर