शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामात सहकार्य न करणाऱ्या शाळांवर होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:14 IST

निवडणूक कामात सहकार्य न करणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा जिल्हा निवडणूक विभागाने घेतला आहे. याची सुरुवात गेल्या आठवड्यात शिवाजी पेठेतील एका शाळेवर कारवाईने झाली आहे.

ठळक मुद्दे निवडणूक कामात सहकार्य न करणाऱ्या शाळांवर होणार गुन्हे दाखलकोल्हापूर जिल्हा निवडणूक विभागाकडून गांभिर्याने विचार

प्रवीण देसाई

कोल्हापूर : निवडणूक कामात सहकार्य न करणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा जिल्हा निवडणूक विभागाने घेतला आहे. याची सुरुवात गेल्या आठवड्यात शिवाजी पेठेतील एका शाळेवर कारवाईने झाली आहे.मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम ३१ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे नवमतदारांनी नोंदणी करावी, तसेच नावातील दुरुस्ती, स्थलांतरामुळे मतदान वगळणी आदी प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

रविवारी सुट्टीच्या दिवशी शाळांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) थांबून मतदान प्रक्रिया राबवत आहेत. गेल्या आठवड्यात शिवाजी पेठेतील महापालिकेच्या एका शाळेत ‘बीएलओ’ गेला असता ती शाळा कुलूप बंद असल्याची आढळली.

शाळेच्या व्यवस्थापनाला कळवूनही दुपारपर्यंत ही शाळा उघडली नव्हती. अखेर तो ‘बीएलओ’शाळे बाहेर बसून राहीला. शाळा भेटीसाठी गेलेल्या जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ या शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कार्य असताना शाळांनी अशा पध्दतीने भूमिका घेणे चुकीचे आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने या कारवाईनंतर अशा पध्दतीने कोणी शाळा बंद ठेवणार असेल तर संबंधित मुख्याध्यापक किंवा शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याचा बडगा उगारला आहे. तशी कल्पना सर्व शाळांनाही देण्यात आली आहे.

२२ ‘बीएलओ’ना नोटीसआॅक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदार नोंदणी कार्यक्रमासाठी गैरहजर राहीलेल्या २२ ‘बीएलओ’ना करवीरच्या प्रांताधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये या ‘बीएलओ’ नी नोटीसीला उत्तर दिली असून काहींनी आजारी असल्याचे कळविले आहे. याबाबत शहानिशा केली जात आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी