शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: खिद्रापूरमधील शिलालेखावर सापडले कोरीव अवशेष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 17:15 IST

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिराच्या स्वर्ग मंडपात रोमन काळातील रोमन व्यापाराचा नाइन मेन्स माॅरीस व ...

कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील ऐतिहासिक कोपेश्वर मंदिराच्या स्वर्ग मंडपात रोमन काळातील रोमन व्यापाराचा नाइन मेन्स माॅरीस व पंचखेलीया या खेळांचे शिलालेखावर कोरीव अवशेष सापडले आहेत. त्यामुळे मंदिरात रोमन व्यापारी, पर्यटक येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिक येथील प्राचीन पटखेळ संवर्धन मोहिमेचे प्रमुख सोज्वळ साळी व रत्नागिरी येथील स्नेहल बने यांनी हे अवशेष शोधले आहेत.खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर हेमाडपंती शिल्पकला आहे. सुमारे एक एकर क्षेत्रात बाराव्या शतकातील शिवमंदिर असून, शिल्पकला, आभूषणे, दिग्पाल या कलांनी नटलेले मंदिर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे या मंदिराची जबाबदारी आहे.पर्यटकासह विविध इतिहास संशोधक या मंदिराला भेट देऊन अधिक संशोधन करण्याचा प्रयत्न करत असतात. नाशिक पटखेळ संवर्धन मोहिमेचे प्रमुख साळी व बने यांना कोपेश्वर मंदिरातील स्वर्ग मंडपातील शिलावर पटखेळांचे अवशेष दिसल्याने संशोधनातून रोमन काळातील पटखेळ असल्याचे सिद्ध झाले आहे.

कोरीव अवशेषपंचखेलीया हा पटखेळ बौद्धिक आणि करमणुकीचा खेळ आहे. रोमन काळाच्या आधीपासून भारतात खेळ खेळला जातो. देश, विभागानुसार या खेळाचे नाव बदलत असते. कोपेश्वर मंदिरातील शिलालेखावर पटखेळाचे कोरीव अवशेष आहेत. - शशांक चोथे, कोपेश्वर मंदिर व इतिहास अभ्यासक

टॅग्स :kolhapurकोल्हापूर