शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

कोल्हापूरला नाईट लँडिंगसह कार्गो हब : सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:03 IST

कोल्हापूर विमानतळावर लवकरच नाईट लॅँडिंग सुविधेसह कार्गो हब निर्माण केले जाईल, अशी घोषणा नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे बोलताना केली. कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनल इमारत आणि

ठळक मुद्देविमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज’ नामकरण; विमाने पाण्यावर उतरण्याची नवी योजना

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावर लवकरच नाईट लॅँडिंग सुविधेसह कार्गो हब निर्माण केले जाईल, अशी घोषणा नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे बोलताना केली. कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनल इमारत आणि एटीसी टॉवरचे रिमोट कंट्रोलद्वारे भूमिपूजन मंत्री प्रभू यांच्या हस्ते झाले. या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याची घोषणा केली.

मंत्री प्रभू म्हणाले, कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणानंतर येथे मोठी विमाने उतरतीलच तसेच जागतिक स्तरावरील सर्व सुविधा या विमानतळावर उपलब्ध करून देऊ. आज विमाने पाण्यावर उतरण्याची नवी योजनाही आखली आहे. उड्डाण-३ अंतर्गत २३५ ठिकाणी विमानसेवा सुरू होईल.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरच्या विमानसेवेसाठी राज्य शासनामार्फत आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल. राज्यात रस्ते, रेल्वे, विमानसेवा, जलसेवेद्वारे दळणवळणाच्या नवनव्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने ३० टक्क्यांचा हिस्सा म्हणून ८४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या विमानतळावर पार्किंग हब आणि कार्गो हब सुरू व्हावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात विमानसेवा सुरू करावी.’

कवठेमहांकाळ येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार संजय पाटील यांच्या कल्पनेतून ‘ड्रायपोर्ट’ सुरू होत आहे. यामध्ये पश्चिम महाराष्टÑातील, राज्याच्या भागातून निर्यात योग्य माल आणला जाईल. तेथून तो कोणत्या ठिकाणी पाठवायचा हे ठरविले जाईल, त्यामुळे गतीने मालाची वाहतूक होईल, त्याचाच एक भाग म्हणजे कोल्हापूर विमानतळ होय. विमानतळाच्या आतील भागातील स्टॉल हे महिला बचत गटांना देण्यात येणार असून त्यामुळे कोल्हापूरच्या वस्तू, पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध होईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. खा. राजू शेट्टी यांनी दिल्ली ते कोल्हापूर विमानसेवा सुरू करावी. येथील भाजीपाला, गूळ निर्यातसाठी कृषी माल वाहतूक हवाईसेवा सुरू करावी, अशी मागणी केली.

राजाराम महाराज यांचे नाव का..?राजाराम महाराज यांनी १९३९ ला कोल्हापूर विमानतळासाठी २७४ एकर जागा दिली होती. त्याकाळी कोल्हापूर-मुंबई विमानसेवाही सुरू केली होती. अशा महाराजांची स्मृती कायम राहावी यासाठी राजाराम महाराज प्रेमींकडून राष्ट्रीय मोडी विकास प्रबोधिनीतर्फे २००४ ला या विमानतळास राजाराम महाराज यांचे नाव देण्याची मागणी सर्वप्रथम करण्यात आली.विमानतळावर शिव-शाहू-संभाजी संग्रहालयमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, ‘कोल्हापूर विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देणारे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याची माहिती देणारे तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याची माहिती देणारे दर्जेदार संग्रहालय उभे केले जाईल, यासाठी केंद्र व राज्य शासन निश्चितपणे पुढाकार घेईल.’कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे पूर्णत्वास नेऊपश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणाºया कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्गास केंद्राने मान्यता दिली असून, त्यासाठी पाठपुरावा करून हे काम निश्चितपणे पूर्णत्वाला नेऊ, अशी ग्वाही मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे दिली. कोल्हापुरातील शाहू महाराज टर्मिनस येथे उभारलेल्या नवीन विश्रामकक्षाचे व पादचारी पुलाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.कोल्हापूर विमानतळाच्या नव्या आराखड्याच्या प्रतिकृतीचे निरीक्षण करताना केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू. शेजारी चंद्रकांत पाटील, संभाजीराजे, डॉ. डी. वाय. पाटील, एन. के. शुक्ला, धनंजय महाडिक, आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ