शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, वेशांतर करून तो येतोय ती च्या रुपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 01:28 IST

सायकल व चालत तो परिसरातील अपार्टमेंटची रेकी करीत असतो. नागाळा पार्कातील रत्नोदय सोसायटी, जिल्हा परिषद, वारणा कॉलनी, नागोबा देवालय परिसरात महिलेच्या वेशामध्ये फिरत असताना त्याला नागरिकांनी पाहिले आहे. वारणा कॉलनी चौकात त्याला काही नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला

ठळक मुद्देसंशयिताकडून अपार्टमेंटची रेकी : सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित कैद

कोल्हापूर : वेशांतर करून नागाळा पार्क परिसरात अपार्टमेंटची रेकी करीत संशयितरीत्या फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, त्यासाठी पथक नियुक्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी बुधवारी दिली.

मध्यम बांधा आणि सव्वापाच फूट उंची असलेला ३० वर्षांची धिप्पाड व्यक्ती दिवस-रात्र महिलांच्या वेशात नागाळा पार्क परिसरात फिरत असते. सायकल व चालत तो परिसरातील अपार्टमेंटची रेकी करीत असतो. नागाळा पार्कातील रत्नोदय सोसायटी, जिल्हा परिषद, वारणा कॉलनी, नागोबा देवालय परिसरात महिलेच्या वेशामध्ये फिरत असताना त्याला नागरिकांनी पाहिले आहे. वारणा कॉलनी चौकात त्याला काही नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता हिसडा मारून त्याने पलायन केले. तोंडाला रुमाल व अंगावर मुलींचा ड्रेस घालून फिरतो. डोळ्याला चष्माही असतो. धष्टपुष्ट असल्याने, तसेच महिलेच्या वेशात असल्याने कोणाला संशय येत नाही. या प्रकाराबाबत काही नागरिकांनी शाहूपुरीचे निरीक्षक कटकधोंड यांची भेट घेऊन तक्रार दिली.

 

  • संशयिताचे सीसीटीव्ही फुटेज

संशयित नागाळा पार्क येथील सोसायटीमध्ये रेकी करीत होता. कोणी नसल्याचे पाहून तो आतमध्ये घुसला. येथील रहिवाशांना शंका आल्याने त्यांनी आरडाओरड करताच त्याने पलायन केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो महिलेच्या वेशात रेकी करीत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसारित झाल्याने नागरिकांत भीती पसरली आहे. संशयित दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन निरीक्षक कटकधोंड यांनी केले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी